महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदी सरकारचा अल्पसंख्याक शिक्षणविषयक निर्णय म्हणजे पुतणा मावशीचे प्रेम! - सचिन सावंत - criticises on modi

अल्पसंख्याक समाजाबद्दल भाजपला आलेला पुळका हा मुस्लीम समाजाचा विश्वास प्राप्त करण्यासाठी नसून सहिष्णू हिंदूचे ह्रदय अल्पसंख्याक व दलितांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे पाजळत आहे यासाठी आहे.

सचिन सावंत

By

Published : Jun 12, 2019, 8:21 PM IST

मुंबई - मोदी सरकारने अल्पसंख्यांकाकरीता मदरशांचे आधुनिकीकरण तसेच शिष्यवृती देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे मोदी सरकारचे अल्पसंख्यांकाबद्दलची कणव नसून पुतणा मावशीचे प्रेम असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्र सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत करत असतात. परंतु, मोदी सरकारने मदरशांचे आधुनिकीकरण व शिष्यवृत्तीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे स्वागत अजूनपर्यंत का केले नाही? या प्रश्नाच्या उत्तरातच भाजपचा दुटप्पीपणा दडलेला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

अल्पसंख्याक समाजाबद्दल भाजपला आलेला पुळका हा मुस्लीम समाजाचा विश्वास प्राप्त करण्यासाठी नसून सहिष्णू हिंदूचे ह्रदय अल्पसंख्याक व दलितांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे पाजळत आहे यासाठी आहे. बहुसंख्य भारतीय हा सहिष्णू व धर्मनिरपेक्ष आहे. त्यातही हिंदू बहुसंख्येने याच विचाराचा आहे.

देशभरात भाजपचे सरकार आल्यानंतर अल्पसंख्याक व दलित समाजावर होणारे अत्याचार, मॉब लिंचिंग तसेच भाजप नेत्यांची विधाने ही या वर्गाला आवडणारी नाहीत. त्यामुळे भाजप व संघाच्या चेहऱ्याची एक बाजू ही क्रूर दिसत असल्याने सहिष्णू बहुसख्यांकांना आपल्याबद्दल तिरस्कार निर्माण होऊ नये याकरीता अल्पसंख्यांकाबद्दल आपल्याला किती कळवळा आहे, हे दाखवणे व सबका विश्वास या घोषणेअंतर्गत सहिष्णूतेचा मुखवटा घालण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे सावंत म्हणाले.

अल्पसंख्यांकाच्या संदर्भात खऱ्या अर्थाने जर भूमिका बदललेली मोदींना दाखवण्याचे असेल तर त्यांनी प्रज्ञा ठाकूरची पक्षातून हकालपट्टी करावी, रामजादे हमारजादे, पाकिस्तानात जाण्यास सांगणारे, मुस्लीमांची मतेच नको म्हणणाऱ्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उचलावा आणि मॉब लिंचिंग करणाऱ्या व दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना संरक्षण देणे थांबवावे, अशी मागणीही सावंत यांनी केली.

सावंत पुढे असेही म्हणाले की, मुस्लीम समाजाच्या प्रगतीची खरोखरच चिंता असेल तर गेले पाच वर्षे जाणीवपूर्वक टाळत असलेले पाच टक्के मुस्लीम आरक्षण लागू करण्याचे आदेश द्यावेत. भाजप शिवसेनेचे सरकार हे सबका अविश्वास असणारे असून अल्पसंख्यांकांचा यांच्यावर काडीचाही विश्वास राहिलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details