मुंबई :आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर काँग्रेस पक्षाची जिल्हास्तरीय बैठक झाली. या बैठीकीला काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत मुंबई प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष भाई जगतापांची प्रमुख उपस्थिती होती.
यासोबतच मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा अजंता यादव व कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी सुद्धा या बैठकीला उपस्थिती दर्शवली. या पदाधिकारी बैठकीदरम्यान भाई जगताप यांनी आगामी काळातील महानगरपालिका निवडणुकीसाठीची रणनीती आणि आराखडा समजावला.
मुंबई प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष भाई जगताप काँग्रेस मुंबईत 227 जागा लढवणार
बीएमसी निवडणूक आम्ही 227 सीट पूर्णपण लढणार आहोत, असे भाई जगतापांनी म्हटले.
भाजपला प्रत्युत्तर
आरोग्य विभागातील परिक्षा काल अचानक रद्द करण्यात आल्या. यामुळे घोळ आणि घोटाळेबाज सरकार, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. यावर भाई जगतापांनी प्रत्युत्तर दिलं. 'घोटाळ्याच्या गोष्टी भारतीय जनता पक्षालाने आमच्यासमोर करू नये', असे भाईंनी म्हटले.
हेही वाचा -पोस्टातून पत्र येतात त्याप्रमाणे ईडीतून नोटिसा यायला लागल्या - बुलडाण्यात सुप्रिया सुळेंची टीका