मुंबई :कुठल्याही बालकाला दत्त घेत असताना त्यातील कागदपत्रंची पूर्तता करणे हे अत्यंत अनिवार्य आहे. परंतु या कागदपत्रांमध्ये कोणताही संशय येणार नाही, अशा रीतीने कायद्याचे नियम आहे. मात्र त्या नियमांचे पालन झाले नाही तर संबंधित यंत्रणा किंवा न्यायालय ती दत्तक प्रक्रिया रोखू शकते. ही बाब मुंबईतील एका घटनेतून समोर आली. न्यायालयाने आता या दत्तक घेण्याच्या प्रक्रियेला चार आठवड्यांची संगती दिलेली आहे. ज्या लहान बाळाला ते जोडपे दत्तक घेत होते त्या बाळाला त्याच्या आईकडे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
चार आठवड्यांची स्थगिती :दिवाणी न्यायालयाने चार आठवड्यांची स्थगिती देताना म्हटले की, प्रतिवादी अर्थात दत्तक घेणारे जोडपे पालक हे दत्तक घेताना मूल देणे आणि घेणे यासंबंधी तथ्य स्थापित करण्यासाठी विश्वसनीय आणि संदेश देणारे पुरावे देऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत, केवळ मुलाचा ताबा मूल दत्तक म्हणून कसा काय देता येऊ शकतो. जोपर्यंत विश्वसनीय सत्य आणि खरी माहिती प्राप्त होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया कशी काय पूर्ण होऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे. सबब जन्म देणाऱ्या आईकडे त्या बाळाला पुन्हा परत करा असे म्हणत न्यायालयाने दत्तक घेणाऱ्या जोडप्यांना एक प्रकारे फटकारलेले आहे.
न्यायालयात याचिका दाखल : दत्तक पालकांनी बाळाच्या आईच्या या याचिकेला विरोध केला होता आणि असे सादर केले की, त्यांनी मूल दत्तक घेतले आहे. मात्र गेल्या वर्षी फर्नांडिस यांच्यावर कथित सहाय्यक शबाना शेख हिच्यासोबत एक गुन्ह्याची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवजात मुलीला 4 लाख 50 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तेव्हा बाळाची आई पुढे म्हणाली की, दत्तक पालकांनी 2021 मध्ये न्यायालयात दत्तक याचिका दाखल केली. मात्र बाळाच्या आईने तिच्या पतीला सांगितले आणि तिने न्यायालयाला कळवले की, त्यांना त्यांचे मूल दत्तक द्यायचे नाही. मग मूल दत्तक घेण्यासाठी कोण कशी काय सक्ती करू शकता असे देखील बाळाच्या आईने आपल्या याचिकेमध्ये नमूद केलेले आहे.
न्यायालयामध्ये दत्तक घेणाऱ्या जोडप्यांची याचिका फेटाळली : बाळाच्या आईने याचिकेमध्ये हे देखील नमूद केलेले आहे की, जेव्हा मार्च 2022 मध्ये न्यायालयामध्ये दत्तक घेणाऱ्या जोडप्यांची याचिका फेटाळली गेली होती. तरी देखील ते दत्त घेण्याचा प्रयत्न करत होते आणि आम्हाला जर त्यांच्या बाबत परिपूर्ण माहितीची खात्री होत नाही, तोपर्यंत आम्ही कसा काय त्याचा विचार करणार. माझ्या पतीला मी सांगितले की, आपल्याला मूल दत्तक द्यायचे नाही तरी ते कसे काय या संदर्भात पूर्ण प्रक्रिया न करता मूलाचा ताबा घेऊ शकता त्यासाठी पोलिसांकडे संपर्क देखील साधला होता.