महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवभारताची संकल्पना विस्तारणारा अर्थसंकल्प, याचे आम्ही स्वागतच करतो - मुख्यमंत्री - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हा भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प या सरकारद्वारे सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटींची गुंतवणूक दाखण्यात आली असल्याने सर्वच क्षेत्राला त्याचा लाभ होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री

By

Published : Jul 5, 2019, 5:44 PM IST

मुंबई -अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भविष्याचा वेध घेणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प मांडल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंत देशाची आर्थिक व्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा विचार केला आहे. या विचाराला अनुसरूनच स्वप्नपूर्तीच्या दिशेने जाणार हा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन मांडला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटींची गुंतवणूक दाखण्यात आली असल्याने सर्वच क्षेत्राला त्याचा लाभ होणार आहे. यात देशातील गाव-गरीब आणि शेतकरी यांचा विशेषत: विचार करण्यात आला आहे. ग्रामीण रस्त्यांसाठी ८० हजार कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचा हा एकप्रकारे रोड मॅप असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details