महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chheda nagar Flyover Status : ईस्टर्न फ्रीवेवरील वाहतूक कोंडी लवकरच मिटणार : छेडानगर जंक्शन पूल वाहतुकीसाठी होणार खुला - छेडानगर पुल

मुंबई छेडानगर जंक्शन पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मानखुर्द ते ठाणे आता काही मिनिटात जाता येईल. मुंबईत ईस्टर्न फ्री वेवरुन येता जाताना आता छेडानगर पुलाचा वाहतुकीस अडथळा होणार नाही.

Chheda Nagar Bridge
छेडा नगर पुल

By

Published : Jan 20, 2023, 10:23 AM IST

छेडा नगर जंक्शन पूल

मुंबई :मुंबईमध्ये ज्याप्रमाणे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर प्रचंड लोकसंख्या प्रवास करते. त्याचप्रमाणे रस्त्यांवरून देखील कोट्यावधी जनता प्रवास करते. त्यामुळेच रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प मुंबई महानगर प्राधिकरण यांच्याकडून सुरू आहे. छेडानगर जंक्शन येथे आता ईस्टर्न फ्रीवेवरून ठाण्याला जाणाऱ्या वाहनांना हा पुलाचा मार्ग मोकळा होणार आहे. 15 फेब्रुवारीपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.


वाहतुकीची कोंडी फुटणार :येत्या ३० दिवसात मुंबईतील मानखुर उपनगरामधून ठाण्याला जोडणाऱ्या छेडानगर जंक्शन येथील वाहतुकीची कोंडी आता फुटणार आहे. ईस्टर्न फ्री वेवरून मुंबई ते ठाणे जी वाहतूक होते ती आता थांबणार नाही खोळंबणार नाही आणि लोकांना काही मिनिटात ठाण्याला पोहोचता येणार आहे याचे कारण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यावतीने पुढील 30 दिवसांमध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची हालचाली सुरू झाल्या आहेत.



वाहतूक जंक्शन पूल खुला : जर छेडानगर वाहतूक जंक्शन पूल खुला झाला, तर ठाण्यातून मुंबईला विशेष करून ईस्टर फ्रीवेवरून मानखुर्द वाशी चेंबूर आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे नंतर मंत्रालयाकडे जाणारी जी वाहतूक आहे, तिला जो अडथळा येत होता तो आता अत्यंत कमी होईल. त्यामुळेच मुंबई महानगर विकास प्राधिकरण यांच्या वतीने छेडानगर वाहतूक सुधारणा प्रकल्प काम करण्यासाठी अनेक महिने यावर लक्ष केंद्रित केले होते. आता हा पूल अंतिम टप्प्यात आलेला आहे.


पूल असा आहे : छेडानगर जंक्शन पूल या प्रकल्पामध्ये तीन उड्डाणपूल असणार आहेत. त्यापैकी एक जमिनीच्या खाली म्हणजे भुयारी रीतीने बांधण्यात येत आहे. या तीन फुलांमधील पहिला पूल हा 680 मीटर लांबीचा आहे. तो ठाणे व सायन यांना जोडतो तर दुसरा उड्डाणपूल बाराशे मीटर लांबीचा आहे तो ठाणे ते मानखुर येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीला जोडतो. तिसरा पूल हा 638 मीटर लांबीचा आहे. जो सांताक्रुज पासून चेंबूर रस्ता उड्डाणपूल इथपर्यंत जोडला जाणार आहे. यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून 250 कोटी रुपये खर्च केले जाते. त्यापैकी 638 मीटरचा चिडा नगर उड्डाणपूल हा मागच्या वर्षी खुला करण्यात आला. हा उड्डाणपूल सांताक्रुज ते चेंबूर रस्ता प्रकल्प यामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यामुळेच छेडानगर जंक्शन येथील वाहतूक कोंडी आता कमी होणार आहे. मानखुर ते ठाणे उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. आता येत्या 30 दिवसात सर्व काम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.



वाहतूक सुधारणा प्रकल्प :यासंदर्भात मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त एम श्रीनिवासन यांच्यासोबत बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, अपेक्षित रीतीने छेडानगर जंक्शन या ठिकाणी हा पूल वेगाने प्रगतीपथावर आहे. छेडानगर वाहतूक सुधारणा प्रकल्प मुंबई विकास प्राधिकरण यांनी हाती घेतला आहे. यामध्ये तीन पूल आहेत. छेडानगर वर्ण ठाण्यामध्ये जायला अडथळा होत होता, म्हणून हे काम हाती घेण्यात आले होते. लवकरच या पुलाचे सर्व काम पूर्ण होईल आणि जनतेसाठी तो खुला होईल.

हेही वाचा :Tribals Protest : इंद्रावती नदीवरील पूल बांधकामाला आदिवासींचा विरोध, छत्तीसगढ सरकारला दिला इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details