मुंबई :आर्थिक वर्ष (Financial Year of Central Railway) 2022-23 मध्ये (एप्रिल ते डिसेंबर) मध्य रेल्वेची कामगिरी गतवर्षीच्या याच कालावधीतील 19कोटी 5 लाख रुपयाच्या तुलनेत 60 कोटी 1 लाख रुपये म्हणजे विक्रमी महसूल (Central Railway Income) ठरला आहे, ज्यामध्ये 215 टक्क्याची प्रचंड वाढ दिसून आली आहे. (Parcel and Goods Traffic) सर्व क्षेत्रीय रेल्वेंमध्ये हे सर्वाधिक आहे. (Latest news from Mumbai)
डिसेंबर 2022 मध्ये करण्यात आलेले प्रमुख करार :
• दि. 19 डिसेंम्बर2022 रोजी 20 EMU चा समावेश असलेल्या बाह्य विनाइल रॅपिंगसाठी मुंबई विभागाकडून 3 वर्षांसाठी 95 लाख 42 हजार रुपयांच्या वार्षिक उत्पनासह 4 कंत्राटे केली।गेली.तसेच जाहिरातीसाठी (5 EMUs च्या) मुंबई विभागाकडून एक करार करण्यात आला ज्याचे वार्षिक उत्पन्न 35 लाख 09 हजार इतके 3 वर्षांसाठी आहे.
रेल डिस्प्ले नेटवर्क- (RDN) :
• मुंबई विभागाकडून 12 डिसेंम्बर 2022 रोजी (5 वर्षांसाठी 4 डिजिटलसह) 6 RDN कॉन्ट्रॅक्ट्स 27 लाख 92 हजार दरवर्षी महसूलासह प्रदान करण्यात आला.तर कलबुर्गी स्टेशनचा एक RDN कॉन्ट्रॅक्ट दि. 14 डिसेंम्बर .2022 रोजी केला. 7लाख 31 हजार रुपयांचा करार 3 वर्षांसाठी करण्यात आला. यामुळे उत्पन्न वाढण्यासाठी प्रक्रिया।गतिमान झाली.
NINFRIS- नवीन, नाविन्यपूर्ण नॉन-फेअर महसूल कल्पना योजना :
• कामगाव गुड्स शेडमध्ये मालाची संकरित हाताळणी 5 वर्षांसाठी वार्षिक 3 लाख रुपये उत्पन्नासह. तर नाशिकरोड स्टेशनवर खादी वस्तूंचा प्रचार करण्यासाठी- एक वर्षासाठी परवाना शुल्क रुपये 80 लाखासह नक्की करण्यात आले.लवकरच दोन्ही कामे सुरू होत आहेत.
दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न :मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्यासोबत या संदर्भात बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, मध्य रेल्वेने आपल्या सर्व विभागांमध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच पार्सलमध्ये एवढी मोठी झेप ही घेऊ शकले. यासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय आणि गतिमान अंमलबजावणी होत आहे. याचे कारण मध्य रेल्वेतील कर्मचारी आणि त्यांची कामाची तत्परता यामुळे हे शक्य झालेले आहे.