महाराष्ट्र

maharashtra

मुंबईत मध्य, हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत

By

Published : Jul 2, 2019, 7:52 PM IST

सीएसएमटी स्थानकावरून सायंकाळी ५ वाजून ३७ मिनिटींनी हार्बर मार्गावरील पहिली लोकल गोरेवला रवाना झाली, तर मध्य मार्गावर ठाण्याला जाणारी अप व डाऊन आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्वपदावर आली आहे.

मुंबईत मध्य, हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत

मुंबई - मुंबईकरांना तब्बल १६ तास वेठीस धरणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकलसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने सीएसएमटी स्थानकावरून घेतलेला आढावा...

लोकल सेवेबाबत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने सीएसएमटी स्थानकावरून घेतलेला आढावा

सीएसएमटी स्थानकावरून सायंकाळी ५ वाजून ३७ मिनिटींनी हार्बर मार्गावरील पहिली लोकल गोरेवला रवाना झाली, तर मध्य मार्गावर ठाण्याला जाणारी अप व डाऊन आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्वपदावर आली आहे.
सोमवारी मध्यरात्रापासून मुंबईत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक रेल्वेमार्गावर पाणी साचले होते. परिणामी हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशीपर्यंतची लोकल सेवा बंद करण्यात आली होती, तर सायन आणि कुर्ला परिसरात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सीएसएमटीकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाली होती. मात्र, पाऊस थांबल्याने लोकल सेवा पुन्हा पूर्वपदावर आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details