महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : भायखळा मंडईत भाज्यांचा मुबलक पुरवठा, प्रत्येकाला मास्क घालूनच बाजारात प्रवेश - कोरोना प्रसार

मुंबईतील भायखळा मंडईत अत्यावश्यक सेवेअंतर्गत फळभाज्या आणि पालेभाज्यांचा मुबलक पुरवठा करण्यात आला आहे. मंडईमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मास्क लावल्याशिवाय आत प्रवेश करण्यास आजपासून मनाई केली जातेय.

मुंबई
मुंबई

By

Published : Mar 27, 2020, 12:41 PM IST

Updated : Mar 27, 2020, 12:57 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, या काळात अत्यावश्यक सेवा या सुरूच राहणार असल्याचे राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईतील भायखळा मंडईत अत्यावश्यक सेवेअंतर्गत फळभाज्या आणि पालेभाज्यांचा मुबलक पुरवठा करण्यात आला आहे. मंडईमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मास्क लावल्याशिवाय आत प्रवेश करण्यास आजपासून मनाई करण्यात येत आहे. याबरोबरच, एरवी या मंडईत दिसणारी गर्दी या काळात खूपच कमी दिसत आहे. भायखळा मंडईतून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...

VIDEO : भायखळा मंडईत भाज्यांचा मुबलक पुरवठा, प्रत्येकाला मास्क घालूनच बाजारात प्रवेश
Last Updated : Mar 27, 2020, 12:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details