कोरोना इफेक्ट : बिल्डरांकडून घराच्या हप्त्यांसह 'कॅन्सलेशन फी' माफ - corona effect builder
लॉकडाऊनचा फटका अर्थव्यवस्थेला बसणार आहे. तर नोकरदारांनाही आर्थिक फटका बसणार आहे. त्यातही गृहकर्ज काढत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारे हवालदिल झाले आहेत. मात्र, काही बिल्डरांनी पुढे येत ग्राहकांना दिलासा दिला आहे.
![कोरोना इफेक्ट : बिल्डरांकडून घराच्या हप्त्यांसह 'कॅन्सलेशन फी' माफ consession in emi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6613893-24-6613893-1585674641620.jpg)
मुंबई -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन असून आर्थिक अडचणीही निर्माण झाल्या आहेत. अशावेळी घर खरेदीदारांच्या मदतीला बिल्डर धावले आहेत. अनेक बिल्डरांनी तीन महिन्यांचा ईएमआय माफ करण्याबरोबरच भाडे माफ केले आहे. तर काहींनी बुकिंग रद्द केल्यानंतर आकारले जाणारे शुल्क अर्थात कॅन्सलेशन फी सुद्धा माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
लॉकडाऊनचा फटका अर्थव्यवस्थेला बसणार आहे. तर नोकरदारांनाही आर्थिक फटका बसणार आहे. त्यातही गृहकर्ज काढत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारे हवालदिल झाले आहेत. मात्र, काही बिल्डरांनी पुढे येत ग्राहकांना दिलासा दिला आहे. मुंबईतील लोढा बिल्डरने आपल्या प्रकल्पातील 200 भाडेकरूचे 3 महिन्यांचे भाडे माफ केले आहे.
दिल्लीतील मिग्सन ग्रुपसह मुंबईतील काही बिल्डरही बुकिंग रद्द केल्यास कोणतीही कॅन्सलेशन फी आकारणार नाहीत. तर काही बिल्डरांनी पुढील तीन महिन्यांचा ईएमआय माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांची काळजी घेतानाच बिल्डर आपल्या मजुरांचीही काळजी घेत आहेत. मुंबईतील चांडक ग्रुपने आपल्या सर्व मजुरांना एक महिन्यांचे धान्य दिले आहे.