महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबईत होळी व धुळवड साजरी करण्यावर निर्बंध; पालिकेकडून नियमावली जाहीर - नवी मुंबईत होळी व धुळवड साजरी करण्यावर निर्बंध

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नवी मुंबई व पनवेल शहरात होळी व धुलीवंदन एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यास महापालिका व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मनाई करण्यात आली आहे.

नवी मुंबईत होळी व धुळवड साजरी करण्यावर निर्बंध
नवी मुंबईत होळी व धुळवड साजरी करण्यावर निर्बंध

By

Published : Mar 27, 2021, 1:33 PM IST

Updated : Mar 27, 2021, 1:42 PM IST

नवी मुंबई-गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव पसरण्याची भीती लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरात होळी व धुळवड साजरी करण्यावर निर्बंध घालण्यात आलेे आहेत.

नवी मुंबईत होळी व धुळवड साजरी करण्यावर निर्बंध
होळी, धुलीवंदन, रंगपंचमी साजरी करण्यास मनाईकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नवी मुंबई व पनवेल शहरात होळी व धुलीवंदन एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यास महापालिका व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मनाई करण्यात आली आहे. तसेच हॉटेल्स, रिसॉर्ट, गृहनिर्माण सोसायटयामधील मोकळ्या जागेत होळी, धुलीवंदन, रंगपंचमी साजरी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
नवी मुंबईत होळी व धुळवड साजरी करण्यावर निर्बंध
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई28 मार्च 2021 ला साजरी होणारी होळी आणि 29 मार्चला साजरा होणारा धुलीवंदनावर नवी मुंबई मनपाने बंदी घातली आहे. जे आदेशाचा भंग करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे.
Last Updated : Mar 27, 2021, 1:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details