महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बेस्टच्या ३४ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, मिळणार 'इतका' बोनस - बेस्ट बस कर्मचाऱ्यांना बोनस

मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असताना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य कर्मचारी आपली जीवाची बाजी लावून रुग्णांना बरे करत होते. तर या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामाच्या आणि घराच्या ठिकाणी पोहचवण्याचे काम बेस्ट कर्मचारी करत होते. यात हजारो पालिका आणि बेस्ट कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले. त्यात शेकडो कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला.

मुंबई
मुंबई

By

Published : Nov 4, 2020, 7:08 PM IST

मुंबई- शहरात कोरोनाच्या प्रसारावेळी अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये बोनस जाहीर केल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना १० हजार १०० रुपये बोनस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमातील ३४ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. बोनसची रक्कम मुंबई महापालिका बेस्टला देणार असून कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात १० नोव्हेंबरपूर्वी जमा करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी दिली. दरम्यान, उद्या गुरुवारी होणाऱ्या बेस्ट समितीच्या बैठकीत सानुग्रह अनुदानावर शिक्कामोर्तब होणार असून बेस्ट उपक्रमावर ३६ कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असताना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य कर्मचारी आपली जीवाची बाजी लावून रुग्णांना बरे करत होते. तारा या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामाच्या आणि घराच्या ठिकाणी पोहचवण्याचे काम बेस्ट कर्मचारी करत होते. यात हजारो पालिका आणि बेस्ट कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले. त्यात शेकडो कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. यामुळे यावर्षी कर्मचाऱ्यांना चांगल्या कामाच्या बदल्यात बोनस द्यावा अशी मागणी केली जात होती. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, कामगार संघटना यांच्यात बैठक झाली. या बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना १० हजार १०० रुपये बोनस म्हणजेच सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले.

किती दिला होता याआधी बोनस -

२०१७ मध्ये ५,५०० रुपये बोनस म्हणजेच सानुग्रह अनुदान दिले होते. ते कर्मचाऱ्यांच्या पगारातून दर महिना ५०० रुपये प्रमाणे कापून घेतले होते. तर २०१८ - १९ चा मिळून ९,१०० रुपये सानुग्रह अनुदान दिले होते. यावेळी १० हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे.

पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे सानुग्रह अनुदान द्या - शंशाक राव

यावर्षी मनपा कामगारांना १५,५०० सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांनाही १५,५०० एवढे सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापकांकडे केल्याचे बेस्ट कृती समितीचे नेते शंशाक राव यांनी सांगितले.

३०० रुपये कोविड भत्ताही देणार -

मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मुंबईत आढळला त्यावेळपासून बेस्ट उपक्रमातील कर्मचारी आपली सेवा बजावत आहे. कोविड योद्धा असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येत असून शिल्लक रक्कम १० नोव्हेंबर पूर्वी देण्यात येईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details