मुंबई- योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी आली होती. या प्रकरणी एटीएसच्या पथकाने मुंबईतून एकाला अटक केली आहे. कामरान अमीन खान (25) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याला चुनाभट्टी परिसरातील म्हाडा कॉलनी येथून अटक करण्यात आली आहे. कामरान हा 2017 पासून बेरोजगार असून तो नशेच्या आहारी गेला आहे.
२२ मे रोजी उत्तर प्रदेेशमधील लखनौच्या गोमतीनगर पोलीस स्टेशनमध्ये एका अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बस्फोटने घडवून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यासाठी लखनौ पोलीस मुख्यालयाच्या सोशल मीडिया डेस्कवर दोन धमक्या देण्यात आल्या. या प्रकरणाचा तपास करणार्या उत्तर प्रदेश एसटीएफला हा फोन करणारा आरोपी मुंबईचा असल्याचे समजले. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसला त्याविषयी माहिती देण्यात आली.
योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी, आरोपीला मुंबईतून अटक
मुंबई योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याबद्दल मुंबईत एकाला अटक करण्यात आली आहे . कामरान अमीन खान (25) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याला चुनाभट्टी परिसरातील म्हाडा कॉलनी येथून अटक करण्यात आली आहे
योगी आदित्यनाथ यांना धमकी देणारा अटक
महाराष्ट्र एटीएसने कामरान या आरोपीला मुंबईतील चुना भट्टी भागातून अटक करून यूपी पोलिसांच्या एसटीएफच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान एसटीएफ अटक आरोपीला रविवारी मुंबईतील कोर्टात ट्रांजिट रिमांडसाठी हजर करणार आहेत.