महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोटरमनच्या सतर्कतेमुळे वाचला एकाचा जीव - motorman saved life in Mumbai

मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे रूळावर झोपून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला मोटरमनने लोकल थांबवून जीव वाचविला.

मुंबई मोटरमन न्यूज
मोटरमनच्या सतर्कतेमुळे वाचला एकाचा जीव

By

Published : May 30, 2021, 8:27 PM IST

मुंबई -मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे रूळावर झोपून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला मोटरमनने लोकल थांबवून जीव वाचविला. मोटरमनने त्या व्यक्तीचे मनपरिवर्तन करून रेल्वे रूळावरून हटविले. मोटरमनच्या सतर्कपणामुळे व्यक्तीचा जीव वाचल्याने मोटरमनचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

ट्रॅकवर असलेल्या व्यक्तीपासून अवघ्या 10-12 मीटर अंतरावर लोकल थांबविली

मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी, (ता. 29) सीएसएमटीहून दुपारी 2.12 वाजता पनवेल करीता सुटली. या लोकलवर कर्तव्यावर मोटरमन पी. के. रत्नाकर होते. लोकल टिळक नगर ते चेंबूर दरम्यान एक व्यक्ती रुळावर झोपून राहिलेली आढळली. टिळक नगर-चेंबूर विभागात न्यूट्रल सेक्शनमध्ये लोकल असल्याने लोकलचा वेग कमी होता. त्यामुळे रत्नाकर यांनी क्षणाचाही विचार न करता तातडीने ब्रेक लावून ट्रॅकवर असलेल्या व्यक्तीपासून अवघ्या 10-12 मीटर अंतरावर लोकल थांबविली. लोकलमधील प्रवाशांनी त्या व्यक्तीला ट्रॅकवरून सुरक्षित ठिकाणी नेण्यास मोटरमनला मदत केली.

मोटरमन रत्नाकर यांच्या निर्णयाने दुर्घटना टळली
मोटरमन रत्नाकर यांच्या क्षणात घेतलेल्या निर्णयाने दुर्घटना टळली. त्यांनी केलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे. लोकल ट्रेनच्या गार्डकडूनही कंट्रोलला याची माहिती देण्यात आली. मोटरमनचा सावधपणा आणि वेळेवर तसेच त्वरित केलेल्या कारवाईमुळे एकाचा जीव वाचला. त्यांना योग्य पुरस्कार देण्यात येईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

मयूर शेळकेने जीवाची पर्वा न करता वाचवला होता जीव
काही दिवसांपूर्वी वांगणी स्थानकाच्या फलाटावरून रेल्वे रुळांवर पडलेल्या एका नेत्रहीन महिलेच्या चिमुकल्याला धावत्या एक्स्प्रेससमोरून वाचवण्यासाठी पॉइंटमनच्या रूपात चक्क देवदूतच अवतरल्याची चित्तथरारक घटना समोर आली आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता धावत्या एक्स्प्रेससमोरून पॉइंटमन मयूर शेळके या २८ वर्षीय धाडसी तरुणाने मृत्यूच्या जबड्यातून चिमुकल्याचे प्राण वाचवले आहेत. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details