मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबईच्या उत्पादन ( Mumbai Airport Customs ) सीमा विभागाने मोठी कारवाई केली आहे. दोन प्रकरणांमध्ये एकूण 2.5 कोटी रुपयांचे ( seized a total of 4712 grams of gold ) एकूण 4712 ग्रॅम सोने जप्त केले ( gold worth Rs two crore fifty lakhs ) आहे. मुंबई विमानतळावर सुमारे अडीच कोटींचे सोने कस्टम विभागाने हस्तगत केले. कपड्यात, विमानाच्या शौचालयात हे सोने लपवण्यात आले होते. कस्टम विभागाने केलेल्या झाडाझडतीत हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईमध्ये एअर इंटेलिजन्स युनिटने १.१७ कोटी रुपयांचे अडीच किलो सोने जप्त केले होते. दक्षिण मुंबईतील रहिवाशी आरोपीला या प्रकरणात अटक करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आज पहाटे, मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने केलेल्या झाडाझडतीत सुमारे अडीच कोटी रुपयांचे जप्त करण्यात आले. कपड्याखाली, विमानाच्या टॉयलेटमध्ये सोन लपवल्याचे या कारवाईत उघड झाले आहे. तीन जणांना विभागाने ताब्यात घेतले आहे.
विमानाच्या शौचालयात, कपड्यात लपवले अडीच किलो सोने, कस्टम विभागाच्या झाडाझडतीत पोलखोल
छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबईच्या उत्पादन ( Mumbai Airport Customs ) सीमा विभागाने मोठी कारवाई केली आहे. दोन प्रकरणांमध्ये एकूण 2.5 कोटी रुपयांचे ( seized a total of 4712 grams of gold ) एकूण 4712 ग्रॅम सोने जप्त केले ( gold worth Rs two crore fifty lakhs ) आहे
दिल्ली मुख्यालयातून सीमा शुल्क विभागाच्या प्रवक्त्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीवरून मुंबई सीमाशुल्क पथकाने कारवाई करत परदेशातून मुंबईत पोहोचलेल्या विमानाची झडती घेतली. यादरम्यान, फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये 2,840 ग्रॅम सोने लपविल्याचे आढळून आले. ते सोने सीमाशुल्क पथकाने जप्त केले.
अंडरगारमेंटमध्ये लपविलेले सोने जप्तअन्य एका प्रकरणात, संशयाच्या आधारावर प्रवाशांची झडती घेतली असता कस्टम पथकाने 1,872 ग्रॅम सोने जप्त केले. तीन प्रवाशांनी परिधान केलेल्या खास डिझाइन केलेल्या अंडरगारमेंटमध्ये हे सोने लपवण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या सोन्याचे एकूण वजन ४,७१२ ग्रॅम आहे. त्याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये आहे.तस्करीच्या आरोपाखाली तीन विमान प्रवाशांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. हे सोने कोठून आणले याबाबत आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी मुंबई विमानतळावरच सुमारे 32 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते. त्यामध्ये 2 महिलांसह एकूण 7 जणांना अटक करण्यात आली होती. जप्त केलेल्या सोन्याचे वजन 61 किलो होते.