मुंबई : केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी असलेला मुंबई अहमदाबाद हा बुलेट ट्रेन प्रकल्प ( Mumbai Ahmedabad Bullet Train project ) प्रगतिपथावर असल्याचे सांगितेल जात आहे. मात्र मात्र वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी बुलेट ट्रेनच्या रेल्वे स्थानकाचे काम अद्यापही सुरू झाले नसल्याचे दिसून आले आहे. ते केवळ कागदावरच ( work at BKC Complex only on paper ) असल्याचे सांगण्यात येत आहे.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणीची स्थिती :केंद्र शासनाकडून बुलेट ट्रेन प्रकल्पाला ( Bullet Train project ) गती दिली जात आहे. आतापर्यंत राज्यात 98 टक्के टक्के भूसंपादन करून कामे वेगाने झाली. डिसेंम्बरपर्यंत राज्यातील बुलेट ट्रेन भौतिक प्रगती काम 13.26 टक्के काम झाले आहे. तर दोन्ही राज्यात 98 टक्के भूसंपादन काम पूर्ण झाले आहे. ह्या पार्श्वभूमीवर जपानचे राजदूत हिरॉईशी एफ सुझुकी यांनी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला भेट दिली. त्याबाबतचे ट्विट राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळ यांनी नुकतच केले. भूसंपादनाचे काम इतक्या वेगाने होत आहे. परंतु मुंबईमधील बुलेट ट्रेन प्रकल्पाचे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी मात्र कोणतही प्रकारच काम झालेले नाही. जागेवर जाऊन पाहणी केली असता, साधी एक सुद्धा कुदळ देखील तिथे मारलेले दिसत नाही.
बुलेट ट्रेन रेल्वे मार्गावरील स्थानक : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर एकूण ११ रेल्वे स्थानक आहेत. मुंबई बिकेसी हे सुरुवातीचे स्थानक नंतर ठाणे मात्र येथे जमिनीच्या अर्थात समुद्राच्या खालून भुयारातून मार्ग जाईल. मग विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद आणि अहमदाबाद असे स्थानक असणार आहेत. यामध्ये वांद्रे कुर्ला संकुलात संकुल जिथे भले मोठे मैदान आहे. विविध सार्वजनिक कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि कोरोना महामारीच्या काळामध्ये तात्पुरत्या स्वरूपात येथे मोठे रुग्णालय उभारले होते. त्याच जागेवर बुलेट ट्रेनचे प्रकल्पाचे काम होणार आहे. मात्र ईटीव्ही भारत वतीने घटनास्थळी भेट दिली असता अद्याप येथे साधी कुदळ मारलेली नाही किंवा एक खड्डा देखील खोदलेला दिसत नाही.याला दुजोरा रेल्वे गतिशक्ती महामंडळ प्रवक्त्यांनी देखील दिला.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते अहमदाबाद : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हा 508 किलोमीटरचा मार्ग असेल. मुंबईमधील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट महामंडळाची कार्यालय आहे. भारत सरकारची, राज्य सरकारची विविध महामंडळे त्यांची देखील कार्यालय आहे. तसेच इतर देशांचे काही महत्त्वाचे शासकीय कार्यालय देखील याच भागामध्ये आहे. त्यामुळे वांद्रे कुर्ला संकुल आणि त्याच्या मैदानावर बुलेट ट्रेनचे रेल्वे स्थानकाचे काम अद्यापही सुरू झाले नसल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आश्चर्य व्यक्त केले. एकूण बुलेट ट्रेन साठीचे जे क्षेत्र आहे ते 508 किलोमीटर आहे. त्यापैकी गुजरातमध्ये 348 किलोमीटर दादर नागरा हवेली मध्ये चार किलोमीटर अवघे आणि 156 किलोमीटर मार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे. दादर नागरा हवेली येथे भूसंपादन 100 टक्के काम पूर्ण झाले आहे.महाराष्ट्रात 98 टक्के भूसंपादन झाले असल्याचे महामंडळाने सांगितले आहे. बुलेट ट्रेन ही ताशी 320 किलोमीटर धावू शकते आमदाबाद ते मुंबई केवळ तीन तासात ही ट्रेन टप्पा गाठू शकते. या ट्रेनमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असल्यामुळे या ट्रेनचा खर्च देखील अफाट आहे.