मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा बुलेट ट्रेन ड़्रीम प्रोजेक्ट आहे. (Mumbai Ahmedabad Bullet Train Profile) आधी महाविकास आघाड़ी सरकार असताना (Bullet Train Profile Marathi) या प्रकल्पाला महाराष्ट्रात आडकाठी (NHSRCL) आणली जात असल्याचा आरोप (ETV Bharat Bullet Train Reality Check) भाजपने केला होता. तर आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्याने राज्यातील बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळाली आहे. दरम्यान, 'बुलेट ट्रेनचा फॅक्ट चेक' या ईटीव्ही भारतच्या सिरीजद्वारे (Bullet Train Work Progress in Marathi) महाराष्ट्रातील तसेच गुजरातमधील स्टेशनची सध्यास्थिती काय आहे याबाबतचा फॅक्ट चेक करणार (National High Speed Rail Corporation Limited) आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट - सध्या मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. अरबी समुद्राच्या तळात बोगदा उभारून त्यात बुलेट ट्रेनचा मार्ग तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजप आणि मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती येत असल्याचे शिंदे सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र, महाराष्ट्रातील चार स्थानकांमध्ये अजून पाहिजे त्या गतीने काम सुरू झाले नसल्याचे चित्र 'ईटीव्ही भारत'च्या 'फॅक्ट चेक'मधून समोर आले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारकडून गती - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला राज्य सरकारच्या आवश्यक सर्व मंजुरी तातडीने देण्याचा (Shinde Fadnavis Government Bullet Train) निर्णय यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना केल्याची माहिती मिळत आहे. जपान सरकारच्या सहकार्याने (Japan Government Bullet Train Project) या प्रकल्पाचे काम केले जात असून, या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि केंद्र सरकार अर्थसहाय्य करत आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पांतर्गत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटातल्या भूमिगत स्थानकादरम्यान हे काम केले जाणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
प्रकल्प महाविकास आघाडीमुळे रखडला? - भाजपाची टीका : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प महाविकास आघाडीच्या सरकारमुळे (Mahavikas Aghadi Government Bullet Train) विलंब झाला, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला. ते म्हणाले की, जे तंत्रज्ञान जपानने बुलेट ट्रेनसाठी वापरले आहे तिथे अपघात शून्य टक्के आहे. तर ते तंत्रज्ञान वापरून आपण आपल्या देशाचा विकास करायला विलंब का लावावा. मात्र महाविकास आघाडी शासनाने याला विलंब लावला, त्यामुळेच हा प्रकल्प रखडला.
मुंबई उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील - राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला ( Mumbai Ahmedabad Bullet Train Project ) गती दिली जात आहे. आतापर्यंत राज्यात ९४ टक्के भूसंपादन करून कामे वेगाने झाली आहेत. कामे वेगाने करण्यासाठी राज्य सरकारनेही २५ टक्के भागीदारी केली आहे. बुलेट ट्रेनसाठी रस्त्यामध्ये आडवी येणारी झाडे कापण्यासाठी राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळाने केलेल्या अर्जाला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.