महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bullet Train BKC Station : बुलेट ट्रेनचा फक्त बोलबाला; बीकेसी स्टेशनचे नामोनीशाणही नाही

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे (Mumbai Ahmedabad Bullet Train Profile) मुंबईतील बीकेसी येथील काम प्रत्यक्षात (BKC Mumbai Bullet Train Work Progress) जमिनीवर अद्याप सुरूच झाले नसल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारचा महत्त्वकांक्षी असलेला बुलेट ट्रेन प्रकल्पाला (Bullet Train project Marathi) जपान सरकारचे अर्थसहाय्य आहे. बुलेट ट्रेनच्या संदर्भात भरपूर काम प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले असताना मात्र वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी बुलेट ट्रेनच्या रेल्वे स्थानकाचे (BKC Bullet Train Station) काम अद्यापही सुरू झालेले नाही ते केवळ कागदावरच (BKC Mumbai Station Work Progress) असल्याचे या ठिकाणी दिसून आले आहे. 'ईटीव्ही भारत'ने याबाबतचा स्पॉटवर जाऊन 'रिअ‍ॅलिटी चेक' केला (BKC Bullet Train ETV Bharat Reality Check) असता सध्या काहीच काम सुरू नसल्याचे निदर्शनास आले आहे.

bkc bullet train station
बीकेसी स्टेशन बुलेट ट्रेन

By

Published : Jan 11, 2023, 12:10 AM IST

बीकेसी येथून प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

मुंबई :मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या (Mumbai Ahmedabad Bullet Train Profile) कामाला अखेर मुंबईत मुहूर्त मिळणार (BKC Mumbai Bullet Train Work Progress) आहे. आजपर्यंत प्रत्यक्ष कागदावर असलेल्या बुलेट ट्रेनच्या (Bullet Train project Marathi) बीकेसी येथील कामकाजासंदर्भात कमर्शियल बिड खुल्या करण्यात (BKC Mumbai Station Work News) आल्या आहेत. या स्पर्धेत तीन बड्या कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता (BKC Bullet Train Marathi News) लवकरच वांद्रे कुर्ला संकुलात बुलेट ट्रेनच्या (1800 crores tender announced) प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने (BKC Bullet Train ETV Bharat Reality Check) सांगितले आहे.

  • स्पॉटची स्थिती :केंद्र शासनाकडून बुलेट ट्रेन प्रकल्पाला ( Bullet Train project ) गती दिली जात आहे. आतापर्यंत राज्यात 98 टक्के टक्के भूसंपादन करून काही ठिकाणांची कामे सुरू झाली. डिसेंम्बरपर्यंत राज्यातील बुलेट ट्रेन भौतिक प्रगती काम 13.26 टक्के झाले आहे. तर दोन्ही राज्यात 98 टक्के भूसंपादन काम पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जपानचे राजदूत हिरॉईशी एफ सुझुकी यांनी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला भेट दिली होती. त्याबाबतचे ट्विट राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळ यांनी नुकतच केले. भूसंपादनाचे काम इतक्या वेगाने होत आहे. परंतु मुंबईमधील बुलेट ट्रेन प्रकल्पाचे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी मात्र कोणतेही प्रकारचे काम सुरू झालेले नाही. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी स्पॉटवर जाऊन पाहणी केली असता, साधी एकसुद्धा कुदळ देखील तिथे मारलेले दिसत नाही.
  • काय होणार काम? :वांदे कुर्ला संकुलात पॅकेज सी-1 अंतर्गत बुलेट ट्रेनचे भूमिगत स्थानक होणार आहे. या स्थानकाकरि ता 467 मीटर लांबीच्या कट आणि कव्हर पद्धतीच्या स्थानकाचे बांधकाम करण्यात (Bullet train work in Mumbai will start soon ) येणार आहे. त्यासाठी 66 मीटरच्या टनेल वेंटिलेशन शाफ्टसाठी आरेखन व निर्मितीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. या उभारणीसाठी एक हजार 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे स्थानक 4.9 हेक्टर जागेत उभारले जाणार आहे. 16 डब्यांच्या बुलेट ट्रेनसाठी सहा फलाट उभारण्यात येणार असून प्रवासी सुविधांसह आकर्षक असे भूमिगत स्थानक उभारण्यात येणार आहे. अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या प्रवक्त्या सुषमा गौर यांनी दिली.
    ठळक मुद्दे
  • समुद्राखालून जाणार मार्ग - पुढील काही वर्षात समुद्राखालील भुयारातून बुलेट ट्रेन धावणार असा दावा केंद्र शासनाने केला आहे. यासाठीची तयारी सुरू आहे. बीकेसी ते शिळफाटा या मार्गावरुन २१ किलोमीटर लांबीचा समुद्राच्या खालूम भुयारी मार्ग बनवण्यासाठीची तयारी देखील वेगात सुरू आहे. असा दावा गतिशक्ती महामंडळाने केला आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनुसार देशातील पहिला अंडरवॉटर भुयारी मार्ग असेल. बीकेसीच्या या अंडरग्राउंड स्टेशनमध्ये ६ प्लॅटफॉर्म असतील, ज्याची लांबी ४२५ मीटर असेल. हाय स्पीड ट्रेनसाठी १६ डब्बे असतील. १६ डब्ब्यांनुसार प्लॅटफॉर्म बनवण्यात येणार आहे. बीकेसी स्टेशनच्यावर आयएफएससी बनवण्यात येणार आहे. यासाठी इमारतीची उंची ६० मीटरपर्यंत असणार आहे.
  • मार्गावरील स्थानके :मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर एकूण ११ रेल्वे स्थानके आहेत. मुंबई बीकेसी हे सुरुवातीचे स्थानक आहे. यानंतर ठाण्यापर्यंत जमिनीच्या अर्थात समुद्राच्या खालून भुयारातून मार्ग जाईल. मग विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद आणि अहमदाबाद असे स्थानक असणार आहेत. वांद्रे कुर्ला संकुल संकुल हे एक मोठे मैदान आहे. विविध सार्वजनिक कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि कोरोना महामारीच्या काळामध्ये तात्पुरत्या स्वरूपात येथे मोठे रुग्णालय उभारले होते. त्याच जागेवर बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम होणार आहे. मात्र, ईटीव्ही भारतने घटनास्थळी भेट दिली असता अद्याप येथे साधी कुदळ मारलेली नाही किंवा एक खड्डा देखील खोदलेला दिसत नाही. तसेच.याला दुजोरा रेल्वे गतिशक्ती महामंडळ प्रवक्त्यांनी देखील दिला.
    ठळक मुद्दे
  • बीकेसीचे महत्त्व - मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हा 508 किलोमीटरचा मार्ग असेल. मुंबईमधील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट महामंडळाची कार्यालय आहे. भारत सरकारची, राज्य सरकारची विविध महामंडळे त्यांची देखील कार्यालय आहे. तसेच इतर देशांचे काही महत्त्वाचे शासकीय कार्यालय देखील याच भागामध्ये आहे. त्यामुळे वांद्रे कुर्ला संकुल आणि त्याच्या मैदानावर बुलेट ट्रेनचे रेल्वे स्थानकाचे काम अद्यापही सुरू झाले नसल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आश्चर्य व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details