महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bullet Train Project : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प; महाराष्ट्रात 98 टक्के भूसंपादन पूर्ण

सत्तांतरण झाल्यानंतर राज्यातील विकास कामांना वेग आला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai Ahmedabad bullet train) प्रकल्पाला देखील गती आली आहे. डिसेंबरपर्यंत राज्यातील बुलेट ट्रेन भौतिक प्रगती काम 13.26 टक्के झाले आहे. तर दोन्ही राज्यात 98 टक्के भूसंपादन काम पूर्ण झाले (98 percent land acquired in Maharashtra) आहे. त्यामुळे या कामाला सध्या वेग आला आहे. याबाबतची माहिती रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry Informed) दिली आहे.

Bullet Train Project
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन

By

Published : Dec 19, 2022, 7:46 PM IST

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai Ahmedabad bullet train) प्रकल्पाला गती दिली जात आहे. आतापर्यंत राज्यात 98 टक्के जमीन टक्के भूसंपादन करून कामे वेगाने झाली. कामे वेगाने करण्यासाठी राज्य सरकारनेही २५ टक्के भागीदारी केली आहे. ऑक्टोबरपर्यंत भूसंपादन आणि जमिनीचा ताबा घेण्याचे उद्दिष्ट नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशनने (Railway Ministry Informed) ठेवले होते. डिसेंम्बर पर्यन्त राज्यातील बुलेट ट्रेन भौतिक प्रगती काम 13.26 टक्के काम झाले असेल. तर दोन्ही राज्यात 98 टक्के भूसंपादन (98 percent land acquired in Maharashtra) काम पूर्ण झाले आहे.



बुलेट ट्रेनची खासियत : एकूण बुलेट ट्रेन साठीचे जे क्षेत्र आहे 508 किलोमीटर आहे. त्यापैकी गुजरातमध्ये 348 किलोमीटर, दादर नागरा हवेली मध्ये चार किलोमीटर आणि 156 किलोमीटर मार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे. दादर नागरा हवेली येथे भूसंपादन 100 टक्के काम पूर्ण झाले आहे. बुलेट ट्रेन ही ताशी 320 किलोमीटर धावू शकते. आमदाबाद ते मुंबई केवळ तीन तासात ही ट्रेन टप्पा गाठू शकते. या ट्रेनमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असल्यामुळे या ट्रेनचा खर्च देखील अफाट आहे. ट्रेन मधील खुर्च्या या अत्यंत आरामदायक आहेत. संपूर्ण ट्रेन वातानुकूलित आहे. स्वयंचलित दरवाजे आहे. तसेच इतर ट्रेन पेक्षा वंदे भारत ट्रेनमध्ये प्रसाधनगृहाची सोय अत्यंत सुसज्ज आणि नव्या पद्धतीची आहे. एरवी मेल एक्सप्रेस, एसी डब्यातील प्रसाधनगृहाची व्यवस्था अत्यंत अडचणीची आणि कमी जागा असते. मात्र या ठिकाणी अधिकाधिक जागा आणि खुलेपणा, खेळती हवा असेल असा प्रयत्न केला गेला आहे.



गुजरात ते मुंबई : गुजरात राज्यात 118 किमी काम झाले आहे. 15.7 किमी गर्डर्स लाँच केले गेले. तर नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक फाउंडेशन कास्टिंग 14.36 किमी काम केले गेले. महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यातील समुद्रा खालून भुयारात देखील रेल्वे मार्ग बाबत काम सुरू केले आहे.



किती रेल्वे स्थानक असतील :मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 11 रेल्वे स्थानक आहेत. मुंबई, बिकेसी ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद और अहमदाबाद असे स्थानक असणार आहेत.


बुलेट ट्रेनचा खर्च अफाट :मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची एकूण किंमत 1.08 लाख कोटी रुपये आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार 10,000 कोटी रुपये, गुजरात सरकार 5,000 कोटी रुपये आणि महाराष्ट्र सरकार 5,000 कोटी रुपये नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ला देणार आहे. उर्वरित रक्कम जपानकडून ०.१ टक्के व्याजदराने कर्ज घेतली जाईल.



समुद्राच्या खालून भुयारातून जाणार बुलेट ट्रेन मार्ग : पुढील काही वर्षात समुद्राखालील भुयारातून बुलेट ट्रेन धावणार असून, यासाठीची तयारी सुरू आहे. बीकेसी ते शिळफाटा या मार्गावरुन २१ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग बनवण्यासाठीची तयारी देखील वेगात सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील खाडीच्या खालून भुयारातून बुलेट ट्रेन चा मार्ग जाणार आहे. त्यासाठीचे सर्वेक्षण देखील सुरू केले गेले आहे. देशात बनणारा हा पहिला अंडर वॉटर भुयारी मार्ग असेल. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनुसार, बीकेसीच्या या अंडरग्राउंड स्टेशनमध्ये ६ प्लॅटफॉर्म असतील, ज्याची लांबी ४२५ मीटर असेल. हाय स्पीड ट्रेनसाठी १६ डब्बे असतील. १६ डब्ब्यांनुसार प्लॅटफॉर्म बनवण्यात येणार आहे. बीकेसी स्टेशनच्यावर आयएफएससी बनवण्यात येणार आहे. यासाठी इमारतीची उंची ६० मीटरपर्यंत असणार आहे.



यासंदर्भात रेल्वे गतिशक्ती मंडळ राष्ट्रीय प्रवक्ता सुषमा गौर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, 'दोन्ही राज्यांमध्ये बुलेट ट्रेन चे काम प्रगतीपथावर आहे आणि शासनाने वेळोवेळी त्या संदर्भात कार्यवाही केल्याने, त्यानुसार हा प्रकल्प टप्प्याटप्पाने पुढे जातो आहे. महाराष्ट्रामध्ये 13.26 टक्के तर, गुजरात मध्ये 29 टक्के प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. आणि तर भूसंपादन 98 टक्के झाले आहे.'

ABOUT THE AUTHOR

...view details