मुंबई - शिवसेनेने आपली उमेदवार निवडण्याची पद्धत बदलली आहे, अशी चर्चा होत आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवत असल्याने ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार देखील आहेत. ते युवासेनेतील प्रमुख चेहऱ्यांना, उपनेते आणि महिला आमदार, नगरसेवक यांना निवड समितीत स्थान देत पक्षावरची आपली पकड मजबूत करत आहेत.
आदित्य 'मुख्यमंत्री' पदाचे दावेदार, पक्षाकडून होतेय मोर्चेबांधणी हेही वाचा -दोन वेळेस पराभूत उमेदवारांना उमेदवारी देऊ नका; काँग्रेस नेत्यांची मागणी
युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, अमोल कीर्तीकर, डॉ. श्रीकांत शिंदे, महिला आमदार डॉ. मनीषा कायंदे, खासदार धैर्यशील माने, नगरसेविका शीतल म्हात्रे, शुभा राऊळ, रवींद्र मीरलेकर यांचा या निवड समितीत समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर आगामी विधासभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. यामध्ये उमेदवारांचे निकष ठरवताना त्यांचे मतदारसंघातील सामाजिक योगदान व राजकीय ताकद नेमकी किती आहे याची चाचपणी केली जात आहे.
हेही वाचा -विदर्भवादी नेते लढवणार विधानसभेच्या ४० जागा
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे सत्तेमध्ये सहभागी व्हायचे नाही, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, पक्षाच्यावतीने सत्तेमध्ये प्रमुख पद हे बाळासाहेब यांच्या घरात आले पाहिजे, ही प्रभावी भूमिका आहे आणि त्यासाठी आदित्य आतापासून तयारीला लागले आहेत. म्हणून ते वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ते पक्षात आपला राजकीय प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा -सरकारने चालत्या कामात खिळे टाकून पंक्चर करू नये - नितीन गडकरी
तर दुसरीकडे शिवसेना-भाजप युती लवकरच होईल, असा दावाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यासाठी युतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत दोन बैठकाही पार पडल्या. सध्या मतदारसंघाची अदलाबदल करण्याची चर्चा सुरू आहे. यातच युवासेना नेते आदित्य यांनी 'आरे' ला 'कारे' केले, त्यामुळे युतीचे कोडे सुटतेय का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.