मुंबई -इमारतीचा पुनर्विकास होईल अन् आपण मोठ्या घरात जाऊ असे विक्रोळीतील 13 इमारतीत राहणाऱ्या खोलीधारकांचे स्वप्न 16 वर्षांपासून अपूर्णच राहिले आहे. मोठ्या घराच्या आशेत आजपर्यंत 108 जण मरण पावले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार सुनिल राऊत यांनी पुढाकार घेतला आहे.
मुंबईत 16 वर्षांपासून पुनर्विकास न झाल्याने रहिवाशांचे हाल - owner
या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग कायमचा मार्गी लागावा यासाठी स्थानिक आमदार सुनिल राऊत यांनी सोमवारी एचडीआयएल ग्रुपच्या वांद्रे येथील कार्यालयात पीडित रहिवाशांना घेऊन ठाण मांडले होते. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नाही, असा पवित्रा राऊत यांनी घेतला. यावेळी एचडीआयएलने नरमाईची भूमिका घेत जर हा प्रकल्प दुसरा कोणी विकासक करत असेल तर आम्ही हस्तांतरण करू असे आश्वासन दिले.

कन्नमवार नगर येथील 13 इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न 16 वर्षांपासून प्रलंबित आहे, तसेच काही महिन्याचे भाडे थकीत केले आहे. दिलेले धनादेश वटत नाही. हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी राऊत प्रयत्न करत आहेत. पुनर्विकासाचा प्रश्न रेंगाळल्याने 416 कुटुबीयांच्या घरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. साडेसहा एकर जागेवर 14 इमारती आहेत. यातील काही रहिवाशांनी आपली राहती घरे खाली केली आहेत. त्यापैकी काही कुटुंब पडक्या इमारतीत जीव धोक्यात घालून राहत आहेत. 2004 साली विकासकासोबत पुनर्विकासाचा करार झाला. आता प्रकल्प रखडल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. प्रश्न सोडवण्यासाठी ते शिवसेनेतर्फे विकासकाच्या कार्यालयात गेले होते. मात्र, कार्यालयातर्फे न पटणारी उत्तरे मिळाल्यामुळे राऊत, उपविभाग प्रमुख चंद्रशेखर जाधव, नगरसेवक उपेंद्र सावंत आणि पीडित रहिवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यामुळे नरमलेल्या विकासकांच्या कार्यालयाने ठोस निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे.