मुंबई - मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. हे सरकार आता गोंधळले असून आर्थिक समस्येसंदर्भात मोदी-शाह हे दोघे निर्णय घेत आहेत. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची भूमिका काय आहे हे समजायला मार्ग नसल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच आर्थिक मंदी वरून लक्ष हटवण्यासाठी सरकार सीएए सारखा कायद्याचा मुद्दा पुढे रेटत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. ते मुंबईत एका वृत्तसंस्थेशी बोलत होते.
काँग्रेस पक्ष नागरिकता संशोधन कायद्याच्या विरोधात आहे. नागरिक आणि येथील निवासी नागरिक यामध्ये जो फरक केला आहे. तो धर्माच्या आधारावर केला आहे. मात्र, आम्हाला ते मान्य नाही. कारण भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. या कायद्याची बांधणी आहे. ती एनआरसी, डिटेंशन कँप, नागरिकता सिद्ध करण्यासाठी जे नियम आहेत. ते धर्मावर आधारित आहे. आणि विशेष धर्माच्या विरोधात आहे. ते आम्ही स्वीकार करू शकत नाही. मात्र, भारताचे संविधानाचा मुळ आत्मा हा धर्म निरपेक्ष आहे. यात सरकार आणि धर्म या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. सरकार कायद्याच्या माध्यमातून जे करायचे असेल ते करेल. मात्र, पहिल्यांदाच असे दिसत आहे, की या कायद्याविरोधात शेतकरी, महिला, विद्यार्थी या कायद्याच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांनी याकडे पाहून