मुंबई - मुलुंडच्या पूर्वेकडील जकात नाका परिसरामध्ये असलेल्या क्लीन-अप मार्शलकडून ट्रक चालकांची बेकायदेशीर लूट सुरू असल्याची तक्रार नवघर पोलिसांना मिळाली होती. अखेर या क्लीन-अप मार्शलला मुलुंड पोलिसांनी रंगेहात पकडून गजाआड केले आहे. मुंबई महानगरपालिकेने नेमलेले क्लीन-अप मार्शल अशाप्रकारे वाहनचालकांची लुट करत असल्यामुळे क्लिनअप मार्शलवर वचक ठेवणार तरी कोण? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
क्लिनअप मार्शला बेड्या ठोकल्या -
मुंबईमध्ये पुन्हा एकदा क्लिनअप मार्शलकडून होणारी लूट समोर आलेली आहे. ऐरोली टोल नाक्यावर पालिकेचे क्लिन अप मार्शल वाहन चालकांकडून तब्बल तीन ते चार हजार रुपये अनधिकृतपणे उकळत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी सूरज पांडे, निखिल कलकुथे, जितेंद्र दरवेशी, प्रवीण कारंडे,रोहन खराटे, दीपेश घोलप या क्लिन अप मार्शलसला बेड्या ठोकल्या आहेत.
वारंवार क्लिन अप मार्शलची लूट समोर -
हे सर्व क्लिन अप मार्शल पालिका टी विभागाचे होते. गेले काही दिवस ऐरोली टोल नाक्यावर हे क्लिन अप मार्शल वाहन चालक आणि मुखतः ट्रक चालक यांना अडवत. त्यांना तुम्ही मावा, गुटखा खाऊन थुकला, मास्क नाही लावला वैगरे कारणे सांगून गाड्या थांबवत. नंतर त्यांच्याकडे टोळीने जाऊन तीन ते चार हजार उकळत असत. याबाबत एक नागरिकाने नवघर पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी सापळा रचून या क्लिन अपच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र मुंबईत गेल्या काही दिवसात वारंवार क्लिन अप मार्शलची लूट समोर येत असल्याने पालिका या बाबत काय उपाययोजना करणार हे पाहणे गरजेचे आहे.