महाराष्ट्र

maharashtra

मुलुंडमध्ये कोरोना नियम मोडणाऱ्या हॉटेल चालकावर कारवाई

By

Published : Apr 5, 2021, 5:21 PM IST

मुंबईतील वाढती गर्दी चिंता वाढवणारी ठरत आहे. अशात हॉटेल चालक नियमाचे उल्लंघन करताना दिसत आहेत. अशाच नियमाचे पालन न करणाऱ्या मुलुंड येथील बुमरो गेरेस्टो अँड ग्रील या हॉटेलवर मुलुंड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 15 पेक्षा जास्त जणांची या हॉटेलमध्ये उपस्थिती होती. यामध्ये 13 ग्राहकांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुलुंड कारवाई
मुलुंड कारवाई

मुंबई -कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. रात्री आठ वाजेपर्यंत दुकान हॉटेल उपाहारगृह सुरू ठेवावीत, अशी सूचना असतानाही काही हॉटेलचालक या नियमाचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे. मुलुंडमधील बुमरो गेरेस्टो अँड ग्रील या हॉटेलवर मुलुंड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

हॉटेल कारवाई
रोज दहा दहा हजारावर कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. तरीही रस्त्यावरची आणि बाजारातील गर्दी कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील वाढती गर्दी चिंता वाढवणारी ठरत आहे. अशात हॉटेल चालक नियमाचे उल्लंघन करताना दिसत आहे. अशाच नियमाचे पालन न करणाऱ्या मुलुंड येथील बुमरो गेरेस्टो अँड ग्रील या हॉटेलवर मुलुंड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 15 पेक्षा जास्त जणांची या हॉटेलमध्ये उपस्थिती होती. यामध्ये 13 ग्राहकांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.उपहारगृहासाठी नवे नियमउपाहारगृहे व बार पुर्णतः बंद राहतील. मात्र, उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर तेथे राहणाऱ्या अभ्यागतासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्री ते सोमवार सकाळी असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details