महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी महापौर दत्ता दळवी यांचा जामीन निकाल न्यायालयानं ठेवला राखून - CM Eknath Shinde

Datta Dalvi Bail : मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. मात्र, न्यायालयानं जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवलाय. शुक्रवारी (1 डिसेंबर) सकाळी हा निकाल जाहीर केला जाणार आहे.

Datta Dalvi
मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 7:37 PM IST

मुंबई Datta Dalvi Bail : मुंबई माजी महापौर दत्तात्रय दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या संदर्भात अपशब्द वापरला होता. त्यामुळं शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भांडूप पोलीस ठाण्यामध्ये (Bhandup Police Station) गुन्हा दाखल केला होता. हा खटला मुलुंड न्यायदंडाधिकारी यांच्याकडं पोहोचला. गुरुवारी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. न्यायदंडाधिकारी यांनी याबाबत दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून निकाल राखून ठेवलाय. याबाबतचा निकाल शुक्रवारी सकाळी अकरा वाजता न्यायदंडाधिकारी एम.आर वाशीमकर घोषित करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरणं गंभीर गुन्हा : दोन दिवसांपूर्वी भांडूप येथे जाहीर सभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात शिवीगाळ केली आणि अपशब्द वापरला होता. हा आरोप शिंदे गटाकडून केला होता. त्यानंतर भांडूप पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यानंतर दळवी यांना अटक केली. मुलुंड न्यायदंडाधिकारी यांनी दत्ता दळवी यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती. मात्र, जामीन मिळण्यासाठी गुरुवारी दत्ता दळवी यांच्याकडून वकिलांनी जोरदार युक्तिवाद केलाय.

आरोपी हे मुंबईचे माजी प्रथम नागरिक :दत्ता दळवी यांच्या वतीनं वकिलांनी मुद्दा मांडला की, आरोपी हे मुंबईचे माजी महापौर असून, ते मुंबईचे रहिवासी आहेत. दोन पक्षात असलेल्या अंतर्गत वादातून हे वक्तव्य केलं गेलं आहे. त्यांना न्यायालयानं काही अटी, शर्ती लावाव्या. त्यासाठी ते सहकार्य करण्यास तयार आहेत. त्यांचा जामीन मंजूर करावा.

शिंदे गटाचा जामीनास विरोध : एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी वकिलांची फौज उभी केली होती. वकिलांनी मुद्दा मांडला की, संबंधित आरोपीला जामीन देऊ नये. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात असा बदनामी करणारा अपशब्द त्यांनी वापरला आहे.

पोलिसांकडून देखील जामीनास विरोध : पोलिसांच्या वतीनं वकिलांनी याबद्दल आरोपी दत्ता दळवी यांचा जामीन नाकारण्यात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. त्यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केलं की, आरोपी दत्ता दळवी यांना सोडून दिल्यास ते चौकशीवर प्रभाव टाकू शकतात. तपासामध्ये अडथळा निर्माण करू शकतात. किंवा त्यामुळे वातावरण देखील बिघडू शकतं, त्यामुळं जामीन देऊ नये.

न्यायालयानं निर्णय राखून ठेवला : न्यायदंडाधिकारी यांनी काही काळ सुनावणी तहकूब करीत यानंतर पुन्हा सुनावणी घेतली. त्यावेळेला सरकारी वकिलांनी जोरदार मुद्दा मांडला की, एकनाथ शिंदे यांच्याबाबत आरोपी जाणून बुजून वक्तव्य करत होते, हे व्हिडिओ क्लिपमधून स्पष्ट होतं. मात्र, मुलुंड महानगर दंडाधिकारी एम आर वाशीमकर यांनी याबाबत गुरुवारी सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकून निकाल राखून ठेवलाय. शुक्रवारी सकाळी न्यायालयात ते याबाबतचा निर्णय जाहीर करतील. यासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी स्पष्ट केलं की, शुक्रवारी जामीन मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. दत्ता दळवी यांच्या बाजूनं निकाल लागेल.

हेही वाचा -

  1. दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड; चौघांवर गुन्हा दाखल, पाहा सीसीटीव्ही व्हिडिओ
  2. ठाकरे आणि राऊत यांच्या वक्तव्यांची चौकशी करणार - मंत्री शंभूराज देसाई
  3. सत्तेतील लोकांनीही वादग्रस्त वक्तव्य केलीत, मग त्यांच्यावर कारवाई का नाही?, संजय राऊतांचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details