मुंबई- रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी काही दिवसांपूर्वीच दक्षिण मुंबईचे काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा दिला. याला विरोधाभास म्हणजे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील सभेला मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानीने हजेरी लावली.
मुकेश अंबानींचा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा, तर मुलगा मोदींच्या सभेला - anil ambani
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील सभेला मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानीने हजेरी लावली.
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या सभेमध्ये अंनत अंबानी पुढील रांगेमध्ये बसलेला होता. मी मोदींना ऐकण्यासाठी आल्याचे त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले. मुकेश अंबानींनी दक्षिण मुंबईमधून देवरा यांना पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मुलाने मोदींच्या सभेला लावलेल्या हजेरीची चर्चा होत आहे.
दक्षिण मुंबईचे मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्ष राफेल करारावरुन मुकेश अंबानीचे बंधू अनिल अंबानींवर निशाना साधत आहेत. असे असतानाही त्यांचे बंधू मुकेश यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे.