महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बॉलिवूड ड्रग्स प्रकरण : मुच्छड पानवाल्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - mumbai bollywood drugs case news

बॉलिवूडमधील ड्रग्स तस्करी प्रकरणी एनसीबीकडून मुच्छड पानवाला अटक करण्यात आली होती. आता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

muchhad-panwalya-remanded-in-judicial-custody-for-14-days-in-mumbai
बॉलिवूड ड्रग्स प्रकरण : मुच्छड पानवाल्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

By

Published : Jan 12, 2021, 8:22 PM IST

मुंबई - एनसीबीकडून बॉलिवूडमधील ड्रग्स तस्करी प्रकरणी तपास केला जात आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी एनसीबीकडून करण सजनाणी या ब्रिटिश अनिवासी भारतीयांना अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती. या बरोबर अभिनेत्री दिया मिर्झा हिची मॅनेजर राहिला फर्निचर हिच्यासह आणखी एका महिलेला अटक करण्यात आली होती. तसेच आता मुंबईतला मुच्छड पानवाला या आरोपीला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

मुच्छड पानवाल्याला अटक

कोण आहे मुच्छड पानवाला -

मुच्छड पानवालाचे खरे नाव रामकुमार जय शंकर तिवारी असून 1970 च्या दशकामध्ये मुंबईत आल्यानंतर त्याने त्याच्या वडिलांचा पान बनवण्याचा व्यवसाय सुरू ठेवला होता. मात्र, यामध्ये प्रगती करत त्याने बॉलिवूडमधील सेलिब्रेटी व उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांच्या संपर्कात राहून स्वतःचा व्यवसाय पसरवला. दरम्यान, मुंबईतल्या वेगवेगळ्या परिसरातील उच्चभ्रू वस्ती व बॉलिवूडमधील कलाकारांसोबत मुच्छड पानवाला याची चांगली ओळख आहे.

काय आहे प्रकरण -

बॉलिवूडच्या अंमली पदार्थ प्रकरणातील तस्कर अनूज केशवानीला एनसीबीने अटक केली होती. अनूज केशवानी हा करन सजनानी कडूनच अंमली पदार्थ घेवून तस्करी करायचा. करन सजनानी हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून तो ब्रिटिश नागरीक आहे. एनसीबीने त्याच्याकडून ७५ किलो भारतीय गांजा, तर १२५ किलो परदेशी अंमली पदार्थ जप्त केले आहे. करन हा परदेशी अंमली पदार्थ भारतातील गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मेघालय या राज्यात विकत होता.

हेही वाचा - नायलॉन मांज्याच्या दोऱ्याने गळा कापला गेल्याने वीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details