महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'एमटीएनएल' इमारत आग : घटनेची स्वतः पाहणी करणार -  महापौर महाडेश्वर

या आगीमध्ये अद्याप कोणीही जखमी झाले नाही. त्याबरोबरच या ठिकाणी पहिल्यांदाच रोबोच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

By

Published : Jul 22, 2019, 8:58 PM IST

'एमटीएनएल' इमारत आग : घटनेची स्वतः पाहणी करणार - विश्वनाथ महाडेश्वर

मुंबई - वांद्रे येथील एमटीएनएल (महानगर टेलिफोन निगम लिमिटेड) इमारतीला दुपारच्या सुमारास आग लागली. ही आग विझवण्याचे प्रयत्न सरू आहेत. स्वतः या घटनेची पाहणी करणार असल्याचे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले. त्याबरोबरच अग्निशमन दल चांगल्या प्रकारे काम करत आहे. जवनांनी शर्थीचे प्रयत्न करून लोकांना बाहेर काढले. अनेकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. प्रथमच रोबोने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला, असे महाडेश्वरांनी सांगितले.

'एमटीएनएल' इमारत आग : घटनेची स्वतः पाहणी करणार - विश्वनाथ महाडेश्वर

दरम्यान, एमटीएनएलची ही ९ मजली इमारत असून इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. मात्र, आगीचा धूर इमारतीच्या नवव्या मजल्यापर्यंत पसरला. त्यामुळे घाबरलेले कर्मचारी जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेले होते. त्यामुळे इमारतीच्या गच्चीवर जवळपास 100 जण अडकले होते. यामधील 60 जणांना अग्निशमन दल आणि रोबोने सुरक्षित बाहेर काढले आहे.

या आगीमध्ये अद्याप कोणीही जखमी झाले नाही. त्याबरोबरच या ठिकाणी पहिल्यांदाच रोबोच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details