मुंबई- मतदार याद्या आणि त्यांच्या नावातील त्रुटी दुरुस्त करून त्या तयार केल्या असल्याचा दावा निवडणूक आयोगाकाडून वेळोवेळी करण्यात आला होता. मात्र, तो दावा फोल ठरल्याचा प्रकार कांदिवलीतल्या ठाकूर व्हिलेज येथील मतदानकेंद्रावर उघडकीस आला आहे. या ठिकाणी मतदान क्रमांक एकाचा आणि यादीत नाव दुसऱ्याचे असल्याचे समोर आले आहे.
मतदान क्रमांक एकाचा अन् यादीत नाव दुसऱ्याचे, कांदिवलीतील प्रकार - gopal shetti
मतदान क्रमांक एकाचा आणि मतदार यादीत नाव दुसऱ्याचे.. निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराने महिला मतदार मतदानापासून वंचित... उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील कांदिवलीतल्या मतदान केंद्रावरचा प्रकार
![मतदान क्रमांक एकाचा अन् यादीत नाव दुसऱ्याचे, कांदिवलीतील प्रकार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3136181-541-3136181-1556511621531.jpg)
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यावेळी कांदिवलीतल्या श्याम नारायण हायस्कूलमध्ये मतदार ओळखपत्र आणि त्यासोबत मतदार यादीमध्ये नाव असतानादेखील विना सिंगल या महिलेचे नाव निवडणूक आयोगाच्या यादीत सापडले नाही. तर त्या ठिकाणी आपला मतदान क्रमांक तोच असताना नाव फोटो, दुसऱ्याच महिलेचे आढळून आले. या प्रकारामुळे या महिलेला मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. आपले नाव बरोबर असून ते मतदार यादीतही आहे. मात्र आयोगाकडे असलेल्या यादीमध्ये मात्र दुसऱ्याचेच नाव असल्याचे या महिलेने पुराव्यानिशी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.