मुंबई -गेल्या वर्षापासून महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेल्या कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत एसटी महामंडळाला विक्रमी तोटा सहन करावा लागलेला आहे. आता एसटी महामंडळाचे आर्थिक चाक पूर्वगतीवर येत असतानाच पुन्हा वीकेंड लॉकडाऊनची झळ महमंडळाला बसू लागली आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी तब्बल 18 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच कोरोना काळात महामंडळाचा संचित तोटाही 9 हजार कोटीपेक्षा अधिक झाला आहे.
3 हजार 800 कोटी रुपयांचे नुकसान
कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षापासून संपूर्ण जगाचे अर्थचक्र मंदावले आहे. या मंदावलेल्या अर्थ चक्राला गती देण्यासाठी उद्योग धडपड करत आहे. एसटी महामंडळही याच परिस्थितीतून जात आहे. गेल्या 72 वर्षे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणखी किफायतशीर प्रवासी दळणवळणाची सेवा देणारी लालपरी आता कोरोना महामारीमुळे आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत आली आहे. 4 हजार 549 कोटी रुपयांचा तोटा असणाऱ्या एसटीला कोरोना काळात तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या हक्काच्या 3 हजार 800 कोटीं रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एसटीचा प्रचंड तोटा वाढलेला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात एसटी महामंडळाचा संचित तोटा हा 9 हजार कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचलेला आहे.
दैनंदिन तोट्यात वाढ
गेल्या काही महिन्यांपासून एसटी महामंडळाची चाक हळूहळू रुळावर येत होते. मात्र, कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय बंद असल्याने आणि इतर कार्यक्रमांवर निर्बंध आल्याने प्रवाशांची आवक अत्यंत कमी आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला सतत तोटा होत आहे. सध्या शासनाने वाढत्या कोरोना रुग्णामुळे वीकेंड लॉकडाऊन जाहीर करत 30 एप्रिलपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहे. परिणामी एसटीच्या केवळ 20 टक्के वाहतूक सुरू आहे. यातून दररोज सुमारे 6 कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. कोरोनापूर्वी प्रति दिवस एसटी महामंडळाला 22 कोटी रुपयांचे महसूल मिळत होते. त्यावेळी महामंडळाला 3 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत होते. आता कोरोना काळात 6 कोटी रुपये प्रतिदिवस महसूल मिळत असल्याने सरासरी एसटीला प्रत्येक दिवस 18 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त