मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar) रविवारी अमरावती दौऱ्यावर होते. तेथे झालेल्या एका यर्यक्रमात महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर ( Women and Child Welfare Minister Yashomati Thakur ) यांनी मुख्यमंत्री पदाबाबद मोठे वक्तव्य केले आहे. छोटा मुह बडी बात म्हणत शरद पवार साहेब आपण जर मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचे चित्र जरा वेगळे असते, असे वक्तव्य यशोमती ठाकुर यांनी केले.
Gore's answer to Yashomati : पवार साहेबांना युपीएचे अध्यक्ष करा! देता प्रस्ताव? नीलम गोऱ्हेंचा सवाल - विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar) मुख्यमंत्री असते, तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते असे विधान महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर ( Women and Child Welfare Minister Yashomati Thakur ) यांनी केले. यावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Deputy Speaker of the Legislative Council Dr. Neelam Gorhe) यांनी पवार साहेबांना युपीएचे अध्यक्ष करावे असे सांगत देता प्रस्ताव असा प्रश्न उपस्थित केला आहे.
![Gore's answer to Yashomati : पवार साहेबांना युपीएचे अध्यक्ष करा! देता प्रस्ताव? नीलम गोऱ्हेंचा सवाल Neelam Gorhe](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14985561-895-14985561-1649647604125.jpg)
नीलम गोऱ्हे
यशोमती ठाकुर यांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस असल्याची चर्चा रंगली. तसेच या वक्तव्याने राजकिय क्षेत्रात खळबळ उडाली. महाविकास आघाडी सरकार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आहे, असेही ठाकुर यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उत्तर देताना म्हणले आहे 'मा.यशोमतीताई, मला तर असे वाटते की, पवार साहेबांना युपीए चे अध्यक्ष करावे! त्यामुळे तर पुर्ण भारताला ऊपयोग होईल! देता प्रस्ताव ?
Last Updated : Apr 11, 2022, 10:02 AM IST