महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एमपीएससीमध्ये प्रमोद चौगुले राज्यात प्रथम तर महिलांमधून रुपाली माने अव्वल - एमपीएससी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी (दि. 31 मे) जाहीर करण्यात आला. यामध्ये प्रमोद बाळासो चौगुले हा राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून पहिला आला आहे तर रूपाली गणपत माने ही महिलांमधून पहिली आली आहे तर विजयकुमार परेकर हा मागासवर्गीय गटातून राज्यात पहिला आला आहे. ( MPSC Exam Result 2022 )

महाराष्ट्र लोकसेवा आयोग
महाराष्ट्र लोकसेवा आयोग

By

Published : May 31, 2022, 10:37 PM IST

मुंबई -महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत या परीक्षेची गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध करण्यात आली असून या गुणवत्ता यादीमधील समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांबाबत प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीच्या वेळी अस्तित्वात असलेल्या नियमानुसार कार्यवाही करण्यात आली असल्याचे एमपीएससीने आपल्या पत्रकात म्हटले आहे. ( MPSC Exam Result 2022 )

या परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या व अन्य मुद्यांसंदर्भात विविध न्यायालयात न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या आधी राहून जाहीर करण्यात आला आहे. या निकालानुसार दिव्यांग अनाथ खेळाडू मागास इत्यादीसाठी आरक्षित पदावर शिफारस पात्र उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहूनच करण्यात येणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीकडून आज दोन वेगवेगळे निकाल जाहीर करण्यात आले असून आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा, 2020 चा अंतिम निकाल आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, 2020 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या निकालानुसार गुणवत्ता यादीत आलेल्या एकूण 200 पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येत असल्याचेही आयोगाने म्हटले आहे.

हेही वाचा - MPSC Result News : एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम

ABOUT THE AUTHOR

...view details