महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑगस्ट क्रांती मैदानावर जावून खासदार सुप्रियाताई सुळे, नवाब मलिक यांनी केले अभिवादन - राष्ट्रवादी काँग्रेस न्यूज

‘चले जाव’ म्हणून गांधीजींनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत देशभरातील जनता एकजूट झाली. आजच्या या दिवसाचे स्मरण म्हणून ऑगस्ट क्रांती मैदान येथे जाऊन मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. खासदार सुप्रियाताई सुळे, नवाब मलिक यांची उपस्थिती होती.

ऑगस्ट क्रांती मैदान न्यूज
ऑगस्ट क्रांती मैदान न्यूज

By

Published : Aug 9, 2020, 4:18 PM IST

मुंबई - स्वातंत्र्य चळवळीला निर्णायक दिशा देणारा आजचा दिवस असून या दिवसाचे स्मरण म्हणून ऑगस्ट क्रांती मैदान येथे महात्मा गांधीजींच्या स्मृती स्तंभास व लढयातील क्रांतीवीरांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जाऊन अभिवादन केले.

‘चले जाव’ म्हणून गांधीजींनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत देशभरातील जनता एकजूट झाली. आजच्या या दिवसाचे स्मरण म्हणून ऑगस्ट क्रांती मैदान येथे जाऊन मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

या वेळी, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक उपस्थित होते. याशिवाय, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, मुंबई उपाध्यक्ष नरेंद्र राणे, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, दक्षिण मुंबईतील जिल्हा निरीक्षक, निवडक पदाधिकारी व मुंबई फ्रँटल प्रमुख उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details