मुंबई -कोरोना संकटकाळात तंत्रज्ञान मदतीला आले. पण, याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोशल मीडियावर एखाद्याला शिवीगाळ करणे, ट्रोल करणे, एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावणे, हे केले जात असेल तर सुसंस्कृत समाजाला आणि देशाला चांगले नाही. त्यामुळे समाजात चुकीचे काही घडत असेल तर माझी नैतिक जबाबदारी आहे की मी यावर आवाज उठवला पाहिजे, असे स्पष्ट मत खासदार सुप्रिया सुळे यांनी डोंबिवलीतील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांशी बोलताना व्यक्त केले.
आज (दि. 11 ऑक्टोबर) खासदार सुप्रियाताई सुळे यांनी डोंबिवली येथील जोंधळे इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी केंद्र सरकारचे शैक्षणिक धोरण, येणारे शैक्षणिक, धोरण याबद्दल काय वाटते व तंत्रज्ञान, सोशल मीडिया आणि बातम्या यामध्ये पुढे काय धोरण असले पाहिजे, यासह अन्य विषयांवर झूमद्वारे संवाद साधला.