महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra politics: राज्य राजकीय धमाक्याने गाजतंय, प्रतीक्षा दिल्लीच्या धमाक्याची - प्रतीक्षा दिल्लीच्या धमाक्याची

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या अध्यक्ष पदावरून राजकीय चर्चा सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी राजकारणात दोन भूकंप होतील, एक महाराष्ट्रात तर दुसरा दिल्लीत होणार असल्याचे भाकीत केले होते. राज्यात तर आता एक राजकीय बॉम्ब फुटला मात्र दिल्लीत नेमका कोणता धमाका होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Maharashtra politics
खासदार सुप्रिया सुळे आणि प्रकाश आंबेडकर

By

Published : May 4, 2023, 10:27 PM IST

मुबंई: वंचित महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाविषयी स्फोटक दावा केला होता. येत्या राज्यात दोन मोठे राजकीय बॉम्बस्फोट होणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या अशा प्रकारच्या विधानामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. गेल्या पंधरा दिवसांमध्ये राजकीय स्टेटमेंट जी समोरच आहे. त्यामध्ये अध्यक्ष प्रकाश आंबेडकर अंदाज वर्तवला होता की, राज्यात दोन राजकीय बॉम्ब फुटणार. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील म्हटले होते की, दोन बॉम्ब फुटणार एक राज्यात तर दुसरा दिल्लीत त्याप्रमाणे आता शरद पवार यांनी राजीनामा देऊन एक बॉम्ब राज्यात फोडला आहे.


अंदाज सांगणे कठीण: तर दुसरा बॉम्ब आता काय फुटेल त्यावर खासदार सुप्रिया सुळे काय ट्विट करता याकडे काँग्रेस पक्षाचे लक्ष, सध्या जे राष्ट्रवादी पक्षाचे राजकारण सुरु ते पूर्व नियोजन नुसार सुरु असल्याचा आरोप काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या धमक्या बाबत सांगणे अवघड आहे. मात्र छगन भुजबळ यांना राष्ट्रीय अध्यक्ष करून दिल्लीत दुसरा धमाका शरद पवार करून शकतात.ओबीसीच्या प्रश्न वरून छगन भुजबळ यांनी देशपातळीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. याच गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो आणि अध्यक्ष पदाची माळ छगन भुजबळ यांच्या गळ्यात पडू शकते असे, राजकीय विश्लेषक चंदन शिरवळे यांनी प्रतिक्रिया दिली.

केंद्रीय अध्यक्षपदी सुप्रिया की भुजबळ ? :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी आंदोलनही सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय अध्यक्षपदी आता सुप्रिया सुळे यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रिया सुळे या गेल्या पंधरा वर्षापासून केंद्रीय स्तरावर खासदार म्हणून काम करत आहेत. केंद्रीय स्तरावर असलेला त्यांचा संपर्क, केंद्रीय राजकारणाची समज पाहता सुप्रिया सुळे यांची या पदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या पदासाठी छगन भुजबळ यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू आहे. छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून देशभरात कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे. त्याचा फायदा केंद्रीय स्तरावर होऊ शकतो. अशी एक चर्चा सुरू असली तरी छगन भुजबळ यांचे वाढते वय, त्यांच्यावर मधल्या काळात झालेले आरोप पाहता त्यांना दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: NCP President Politics सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षा उद्याच्या बैठकीत होणार महत्त्वाचा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details