मुंबई -पीएमसी बँकेच्या 9 लाख खातेधारांना त्यांच्या ठेवी कधीपर्यंत मिळतील याची शाश्वती नाही. त्यामुळे एक निश्चित कालमर्यादा केंद्रसरकारने जाहीर करुन खातेदार व गुंतवणूकदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या सभागृहात केली.
लोकसभेत बँकिंग नियमन (सुधारणा) विधेयक 2020 बाबत झालेल्या चर्चेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला. तीन महिन्यात केंद्र सरकारने पीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा देण्यासाठी काय केले, अशी विचारणाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. गेल्या जून महिन्यात सरकारने याबाबत वटहुकूम काढण्याची घोषणा केली होती. पण, याबाबत पुढे काहीच झाले नाही याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजीही व्यक्त केली.