महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MP Supriya Sule birthday : खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुस्तक तुला, सोशल मीडियावरुन केले होते आवाहन

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवशी शुभेच्छूकांनी फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तकांचे वाटप करावे असे आवाहन केले होते. सुप्रिया सुळेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी त्यांची पुस्तक तुला केली.

सुप्रिया सुळे यांची पुस्तक तुला
सुप्रिया सुळे यांची पुस्तक तुला

By

Published : Jun 30, 2023, 3:57 PM IST

खासदार सुप्रिया सुळे यांची पुस्तक तुला

मुंबई : राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस आहे. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसा निमित्ताने शुक्रवारी वायबी सेंटर या ठिकाणी त्यांची पुस्तक तुला करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांसोबत महिला कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियातून कार्यकर्त्यांना आवाहन केले होते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वच सदस्यांना माझ्याप्रती असणारा जिव्हाळा व आस्था नेहमीच व्यक्त करत असतात. उद्या माझ्या वाढदिवसानिमित्तही अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व शुभचिंतक प्रत्यक्ष भेटून आपल्या शुभेच्छा मला देण्यासाठी उत्सुक आहेत. याची मला जाणीव आहे. मी सर्वांना एकच नम्र आवाहन करू इच्छिते की, शुभेच्छूकांनी फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तके, शालेय वस्तू, रेनकोट, भेटवस्तू आदींचे वाटप करावे. या सामाजिक उपक्रमाचे फोटो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करावेत, मी ते माझ्या सोशल मीडिया माध्यमांवर शेअर करेन. आपला पक्ष हा नेहमीच आपली समाजाप्रतीची बांधिलकी जपत आला आहे. आपण हा गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा उपक्रमही नेहमीच्याच तत्परतेने राबवावा, माझ्यासाठी वाढदिवसाची हीच अनमोल भेट ठरेल.

आवाहनाला प्रतिसाद :सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधन पुस्तक तुला करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि महिला पदाधिकाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राजकारणात सुप्रिया सुळेंची एन्ट्री : भारतात परतल्यानंतर 2006 मध्ये त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या. त्यानंतर 2009 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली, यावेळी साडेतीन लाख मतांनी त्या विजयी झाल्या. 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभांच्या निवडणुकांमध्ये सुप्रिया यांनी विजय मिळवला. सोळाव्या लोकसभेत महाराष्ट्राकडून सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुप्रिया एकमेव खासदार होत्या. त्यांनी पाच वर्षात संसदेत 1176 प्रश्न उपस्थित केले होते.


हेही वाचा -

  1. Supriya Sule Birthday : NCP खासदार सुप्रिया सुळेंचा वाढदिवस; जाणून घ्या, थक्क करणारा जीवनप्रवास
  2. Supriya Sule News : अजितदादाच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, हीच माझी इच्छा - सुप्रिया सुळे

ABOUT THE AUTHOR

...view details