मुंबई - निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला. घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच झाडांची पडझड झाली आहे. जनजीवन पूर्ण उद्ध्वस्त झाले. मच्छीमार, गणपती मूर्तीकार, फळबागा, घरांचे नुकसान झाले. तिरडीचा हंगाम सुरू झाला होता. आता शेतकरी तिरडीला जाणार की, घरचे नुकसान पाहणार? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पश्चिम बंगालप्रमाणे लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी, असे खासदार सुनील तटकरे म्हणाले.
निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारच्या सुमारास अलिबागजवळील मुरुड समुद्रकिनारी धडकले. यामुळे रायगड जिल्ह्यात दोघांचा मृत्यू देखील झाला. तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यासाठी खासदार सुनील तटकरे रायगड जिल्ह्याला पाहणी करत आहेत.