मुंबई - राज्यसभेचे खासदार आणि उद्योगपती सुभाष चंद्रा यांनी आपला कफ परेडमधील बंगला चिनी दूतावासाला भाड्याने दिला आहे. 4 लाख 90 हजार रुपये महिना भाडे आकारत 1 जुलैपासून 30 जून 2022 पर्यंत हा बंगला भाड्याने देण्यात आल्याची माहिती भाडे करारातून समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे काही दिवसांपासून भारत-चीन तणाव निर्माण झाला आहे. तसेच 15 जूनला गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या भारत-चीन संघर्षात 20 भारतीय जवानांना वीरमरण आले आहे. यामुळे देशभरातील नागरिकांचा चीनविरोधात राग आहे, असे असताना 29 जूनला हा करार झाल्याचे समोर आले आहे.
खासदार सुभाष चंद्रांचा बंगला भाडे तत्त्वावर; चिनी दुतावासासोबत झाला करार - सुभाष चंद्रा भाडे करार चिनी दूतावास
भारतीय जवानांना वीरमरण आल्यानंतर अनेक बड्या उद्योगपतींनी आणि कंपन्यानी चिनी वस्तू तसेच चिनी कंपन्यावर बहिष्कार टाकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचा नारा दिला. भारतीयांमध्ये चीनबद्दल असलेला राग 15 जूननंतर प्रचंड वाढला, असे असताना सुभाष चंद्रासारख्या बड्या उद्योगपतींनी केलेल्या करारामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भारतीय जवानांना वीरमरण आल्यानंतर अनेक बड्या उद्योगपतींनी आणि कंपन्यानी चिनी वस्तू तसेच चिनी कंपन्यावर बहिष्कार टाकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचा नारा दिला. भारतीयांमध्ये चीनबद्दल असलेला राग 15 जूननंतर प्रचंड वाढला. असे असताना सुभाष चंद्रासारख्या बड्या उद्योगपतींनी आणि आपला बंगला चिनी दूतावासाला भाड्याने दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाडे करारानुसार ह्यूआंग झिआंग व्हाईस कौस्नुल, कॉनस्युलेट जनरल ऑफ द पिप्सल्स रिपब्लिक ऑफ चायना यांना हा बंगला भाड्याने दिला आहे. 1 जुलै ते 30 जून 2020 या काळासाठी हा भाडे करार आहे. 2 हजार 590 चौ फुटाचा हा फ्लॅट असून, यासाठी 4 लाख 90 हजार रुपये असे भाडे आकारण्यात आले आहे.
बंगल्याच्या तळमजल्यावर किचन आणि लिव्हिंग रूम असून पहिल्या मजल्यावर तीन बेडरूम तसेच एक लहान मुलांची खोली आहे, तर दुसऱ्या मजल्यावर एक बेडरूम आहे. हा बंगला चिनी दूतावासाकडून आपल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबासाठी वापरला जाणार आहे.