मुंबई: बहू चर्चित मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पाच्या ठिकाणी पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत हे जामिनावर बाहेर आहेत. मात्र संजय राऊत यांच्या पासपोर्ट नूतनीकरण याबाबत काल न्यायालयासमोर अर्ज सादर केला गेला. या अर्जावर अंमलबजावणी संचलनालयाला लेखी प्रतिसाद देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दिले होते. अंमलबजावणी संचलनालयाने कोणताही आक्षेप न घेतल्यामुळे संजय राऊत यांचा पासपोर्ट नूतनीकरण अर्ज मान्य केला गेला.
राऊत यांच्या अर्जाला मंजुरी: सप्त वसुली संचालनालयाने खासदार संजय राऊत यांच्या पासपोर्ट नूतनीकरण अर्जावर आज लेखी प्रतिसाद दिला आणि पासपोर्ट नूतनीकरणाबाबत कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे डिप्लोमॅट पासपोर्ट नूतनीकरण करण्याचा मार्ग आज अखेर मोकळा झालेला आहे. त्यामुळे संजय राऊत यांना पारपत्र नूतनीकरण केल्यानंतर देशाबाहेर सहज जाता येऊ शकते. १९६७च्या पासपोर्ट कायद्यांतर्गत आवश्यक बाबींची पूर्तता केल्याने न्यायालयाने राऊत यांच्या अर्जाला मंजुरी दिली आहे.