मुंबई :मुंबई कोव्हिड घोटाळ्यासंदर्भात मोठी कारवाई करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना ईडीने अटक केली आहे. मुंबईत कोविड सेंटर उभारण्याचे कंत्राट बेकायदेशीरपणे देण्यात आल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. भाजप नेते किरीट सोमैया यांनी याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. यावर भाजप आमदार नतेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुजित पाटकर हे संजय राऊत असून संजय राऊत जास्त काळ तुरुंगाबाहेर राहू शकणार नाहीत, असे टीकास्त्र नितेश राणे यांनी राऊत यांच्यावर सोडले आहे.
संजय राऊतांचे काळ धंदे :सुजित पाटकर यांना कोव्हिड प्रकरणात अटक करण्यात आली आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. सुजित पाटकर नक्की कोण आहेत? संजय राऊत यांच्या सर्व व्यवहारांची, काळ्या धंद्याची माहिती पाटकरकडे आहे. संजय राऊतांचे काळ धंदे चालवण्यासाठी सुजित पाटकर यांना पुढे केले जाते, असा खळबळजनक आरोप देखील नितेश राणे यांनी केला आहे. वास्तविक या सगळ्याचा कर्ता करविता धनी वेगळाच आहे. तो संजय राऊतच असल्याचा एकप्रकारे पुनरुच्चारच राणे यांनी केला आहे.