मुंबई -शिवसेना (Shivsena Leader) नेते, खासदार (MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वी राहुल गांधींसोबत राऊतांची बैठक
संजय राऊत यांनी नुकतीच दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना सांगितला आहे. शिवसेना युपीएचा भाग नाही. मात्र, दिल्लीत राहुल गांधी आणि राऊत यांच्यात जवळकी वाढलेल्याचे चित्र दिसून आले आहे.
उद्धव ठाकरेंसोबत राजकीय
संजय राऊत-उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. 'या भेटीत पक्ष संघटना यावर चर्चा झाली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात घटनात्मक माहिती अशोक चव्हाण सगळ्यांना देणार आहेत. संसदेत मराठा आरक्षण घटनात्मक चर्चा मागणार आहोत. दिल्लीत होत असलेल्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींवरही या बैठकीत चर्चा झाली', अशी माहिती राऊतांनी दिली.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. 'राहुल गांधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी जाणून घेण्यात उत्सुकत होते. त्याबाबतही त्यांनी काही गोष्टी जाणून घेतल्या. जे शिवसेनेने केले ते योग्य केले. त्याचा मालकी हक्क कुणाकडेही नाही. 2024 मध्ये युतीच्या प्रश्नांवर जी काही चर्चा झाली आहे त्याची माहिती मी माझ्या पक्षप्रमुखांना सांगेन', असे राऊत यांनी यावेळी राहुल गांधी यांना सांगितले होते. त्यानुसार आज राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीचा तपशील सांगितला आहे.
हेही वाचा -चर्चा न करता सरकार विधेयक मंजूर करतंय - संजय राऊत