मुंबई :राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने नोंदवलेल्या निरीक्षणानंतर राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटातील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्या गोष्टी बेकायदेशीर आहेत कर सरकार हे कायदेशीर कसे, असा प्रश्न त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून उपस्थित केला आहे. तसेच सरकारने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे, असे देखील संजय राऊत म्हणालेत.
काय म्हणाले संजय राऊत : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. न्यायालयाने एकनाथ शिंदे यांना दिलासा असल्याचे सांगितले जात आहे. पण राज्यपाल ते निवडणूक आयोगापर्यंत सर्वांना न्यायालयाने फटकारले आहे. परंतु खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणे आपण लक्षात घेतली पाहिजेत. शिंदे गटाने बजावलेला व्हीप बेकायदेशीर असून सुनील प्रभू यांचा व्हीप योग्य होता. त्यानुसार 16 आमदार बेकायदेशीर ठरले आहेत. त्या आमदारांचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे. विधानसभा अध्यक्ष हे बेकायदा व्हीपचे पालन करू शकत नाहीत, त्यांनी योग्य व्हीपची खात्री करून अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निर्णय घ्यावा असे संजय राऊत म्हणालेत.
मग सरकार कसे कायदेशीर :सत्तासंघर्षावर निकाल देताना सरन्यायाधीशांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना फटाकरले आहे. राज्यातील राजकरणात राज्यपालांनी घेतले निर्णय चुकीचे असल्याचे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकार असताना विरोधी पक्षाने सरकारविषयी अविश्वासाचा प्रस्ताव दिला नव्हता, त्यावेळी राज्यपालांनी सरकारने विश्वास गमावला किंवा नाही हे तपासणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, जर राज्यपालांनी घेतलेले निर्णय बेकायदेशीर होते याचा अर्थ हे सरकार बेकायदेशीर असल्याचे संजय राऊत म्हणालेत.
नैतिकेतच्या मुद्द्यावर शिंदे सरकारने राजीनामा द्यावा : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राचा सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर झाला आहे. निकालानंतर संजय राऊत म्हणाले, की नैतिकेतच्या मुद्द्यावर शिंदे सरकारने राजीनामा द्यावा. या निकालावर राज्यातील विद्यमान शिंदे फडणवीस सरकारचे भवितव्य अवलंबून होते. प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाकडून शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे. खासदार राऊत हे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी म्हणाले की, निकालाबाबत मला काही अपेक्षा नाही. मला न्यायाची अपेक्षा आहे. आम्ही न्याय विकत घेणारी माणसे नाही. जे न्याय विकत घेऊ शकतात, ते सत्तेवरती आहेत. ज्यांना खात्री वाटते न्याय आमच्या बाजूने लागेल, हा त्यांचा मस्तवालपणा आहे. आम्ही तसे म्हणणार नाही. आमचा न्यायावरती विश्वास आहे. या देशात स्वतंत्र न्यायालय आहे का? देशातली न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे का? या देशात लोकशाही जिवंत आहे का? या बाबतचा फैसला आज होणार आहे. कारण, या देशात लोकशाही आहे, न्यायव्यवस्था आहे.
राहुल नार्वेकर बायस :यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, मी सकाळीच पोस्ट केली. काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ वाट पाहतोय तुझी नरहरी झीरवळ. याचा अर्थ असा ज्यावेळी हे आमदार अपात्र झाले, त्यावेळी विधानसभेत अध्यक्ष म्हणून नरहरी झिरवाळ काम पाहत होते. झीरवळ त्यावेळेस खुर्चीवरती उपाध्यक्षपदी बसलेले होते. त्यांनी जो निर्णय दिला, तो कायदा आणि घटना आणि परिस्थिती पाहून निर्णय दिला. 16 आमदारांच्या बाबतीत ते प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. आत्ता जे नवीन अध्यक्ष सांगत आहे, निर्णय माझ्याकडे येईल म्हणजे कोणाकडे? तुम्ही बायस आहात. तुम्ही घटनाबाह्य सरकार बनवलेल आहे. तुमची निवड घटनाबाह्य आहे.