मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आल्यावर, त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादात (reacted to ongoing controversy) सापडली आहे. राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर आता भाजपने देखील जवाहरलाल नेहरू यांना माफीवीर म्हणायला सुरुवात केली आहे. रणजीत सावरकरयांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली. यावर आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
वीर सावरकर हे वंदनीय : सकाळी आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, 'वीर सावरकर, पंडित जवाहरलाल नेहरू, आणि महात्मा गांधी या सगळ्यांविषयी कोणी काय सांगण्याची गरज नाही. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये प्रत्येकाचे एक वेगळे स्थान आहे. आमच्यासाठी वीर सावरकर हे वंदनीय आहेत आणि प्रिय आहेत. ज्या लोकांनी या देशासाठी आपल्या सुखाचा त्याग केला, या सगळ्या लोकांसाठी देशामध्ये आदर आणि निष्ठा आहे आणि पुढेही राहणार, हे स्वातंत्र्य सेनानी कुठल्याही पार्टीचे नाही, परंतु एक विचारधाराचे आहे, हे सगळ्यांना माहित असले पाहिजे, आता हे स्वातंत्र्य सेनानी जीवित नाही, परंतु कोणीही या महान पुरुषां विरोधात अशी टिप्पणी केली नाही पाहिजे.'