खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना
मुंबई : नागपूरमध्ये सुरू असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी सोडत नाही. मुख्यमंत्र्यांवर भूखंड घोटाळ्याचे आरोप ( land scam case ) केले जात आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका ( MP Sanjay Raut Critics on CM Ekanath Shinde ) केली आहे. सीमावादाबाबत देखील राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आपल्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्र्यांना न्यायालयाने काढावे : शिंदे-फडणवीस सरकार हे घटनाबाह्य सरकार असल्यामुळे सर्वोच न्यायालयानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पायउतार केले पाहिजे. भूखंड घोटाळाप्रकरणी ( Land scam case ) न्यायालयाने निर्णयाला स्थगिती दिली असताना तुम्ही त्यांची स्पष्टोक्ती देत आहे. 110 कोटींमध्ये तुम्ही वाटणी केली आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, न्यायलायच्या निर्णयावरून हे सिद्ध होत की, महाराष्ट्रात भ्रष्टाचार झालेला आहे. गैरव्यवहार झालेला आहे. जर तुमचा निर्णय योग्य होता तर न्यायालयाने स्थगिती का दिली असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला केला आहे.
मुख्यमंत्र्यांवर भूखंड घोटाळ्याचे आरोप : एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना NIT चा 86 कोटींचा भुखंड अवघ्या 2 कोटींना दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हिवाळी अधिवेशनात केला आहे. मुख्यमंत्री असताना या निर्णयाची ऑर्डर काढली असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला. शिंदेंच्या निर्णयानंतर न्यायालयाने यावर ताशेरे ओढले. त्यामुळे आज विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
तिकडे गुंगीचे औषध दिले काय? : खासदार संजय राऊत सीमाप्रश्नावर म्हणाले की, महाराष्ट्राचे क्रांतीकारक मुख्यमंत्र्यांचे काय म्हणणे आहे, हे पाहीले पाहीजे. मध्यस्थी केली म्हणजे काय? जैसे थे म्हणजे काय? एक इंच जमिन देणार नाही. महाराष्ट्रातील हक्क सोडणार नाही अशी भाषा आजवर कोणी बोलले नाही. कर्नाटकाचे मुख्यमंत्री रोज उठतात कानफटीत मारतात. आपले मुख्यमंत्री गाल चोळत विधानभवनात जातात. तो जोर तो जोश आता दाखवा. देवेंद्र असतील किंवा मुख्यंमत्री असतील तुम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी योग्य नाही. स्वतःच्या मुद्यावर तुम्ही तासभर बोलतात. बाजूचा मुख्यमंत्री रोज बेअब्रू करतात. तुम्ही दोघे दिल्लीत गेलात तेंव्हा गुंगीचे औषध दिले काय. तिकडून आले आणि गप्प ते गप्पच आहेत, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
110 कोटींत वाटणी आहे का? : पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "हे लेचेपेचे सरकार आहे. ते घाबरले आहे ते. इथे आम्ही सर्व पक्ष सिमा प्रश्नावर एकत्र असताना, तुम्ही सिमा प्रश्नावर भुमिकाच घेत नाही. मूग गिळून गप्प बसले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना काढले पाहीजे. हे घटनाबाह्य सरकार आहे? न्यायालय म्हणते भ्रष्टाचार झाला. तुम्ही किती रंगसफेदी करा. पण काही उपयोग नाही. त्यात उपमुख्यमंत्री वकिली करतात. ११० कोटीमध्ये तुमची वाटणी आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे : प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या चित्ररथाविषयी बोलताना राऊत म्हणाले की, क्रांतीकारक मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे. त्यांच्या स्वाभिमानी आमदारांनी यावर उत्तर द्यावे की, असे का होत आहे ? हे रोज नवनविन कारणे शोधत आहेत. यांना भिती वाटते आहे भारत जोडो यात्रेची. भारत जोडो यात्रा सुरू राहील.