महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Raut On PM Modi : मणिपूर जळते तरी पंतप्रधान दौऱ्यावर; अमित शाहांनी मणिपूरमध्ये लावावी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक - संजय राऊत - खासदार संजय राऊत

उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्षाच्या बैठकीत महबुबा मुफ्ती यांच्या बाजुला बसवण्यात आले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Sanjay Raut On PM Modi
खासदार संजय राऊत

By

Published : Jun 24, 2023, 11:27 AM IST

मुंबई : मणिपूर जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. मणिपूर प्रकरणी पंतप्रधानांनी बैठक घ्यायला हवी होती, मात्र गृहमंत्री अमित शाहांनी बैठक बोलावली आहे. मणिपूरमध्ये शंभराच्या वर मृत्यू झालेले आहेत. पोलिसांवरती हल्ले झाले असून तिथे आमदारांची घरे जाळली गेली. त्यामुळे अमित शाहांनी मणिपूरमध्ये सर्वपक्षीय बैठक घ्यावी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.

हिंसाचार सरकारच्या नियंत्रणात राहिलेला नाही :अमित शहा गृहमंत्री आणि पोलादी पुरुष असताना देखील ते मणिपूर हिंसाचार थांबवू शकले नाहीत. मणिपूर संदर्भात गृहमंत्री अमित शाहा यांनी दिल्लीला बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी उपस्थित राहतील. पुढली बैठक तात्काळ मणिपूरला घ्यावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. तिकडली जनता तिकडल्या संघटना, राजकीय पक्ष यांनी उग्र आंदोलन सुरू केले. त्या सगळ्यांशी सर्वपक्षीय चर्चा करता येईल, त्यांची मते समजून घेता येईल, अशा प्रकारची बैठक गृह मंत्रालयाने मणिपूरला तात्काळ घ्यावी अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी तोंडाच्या वाफा दवडू नये : विरोधकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना महबुबा मुफ्ती यांच्या बाजुला बसण्यास जागा देण्यात आली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. त्यावर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

केक भरवायला गेलो नाही : कश्मीर हा हिंदुस्थानचा भाग असून त्याच त्याच महबूबा मुक्ती यांच्याबरोबर आपण अडीच वर्ष सरकार बनवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या सरकारमध्ये आपण होतात, त्यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. तेव्हा सडकून टीका करताना जपून टीका करत जा, असा सल्ला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला. आम्ही नवाज शरीफ यांचा केक कापायला गेलो नाही किंवा त्यांच्या सरकारमध्ये सामील झालो नाही. भविष्यात त्याच्यावर आम्ही चर्चा करू. आज उद्धव ठाकरे त्याच्यावर बोलतील, त्यामुळे उगाचच तोंडाच्या वाफा दवडू नका, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. हे तुमचेच पाप असून आगामी निवडणुकीत आम्ही एकत्र निवडणूक लढू असेही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा -

  1. Pratavarao Jadhav On Sanjay Raut: खा. प्रतापराव जाधव यांची जीभ घसरली, संजय राऊतांवर केली हीन शब्दात टीका
  2. Vikhe Patil Criticized Sanjay Raut: झाकीर नाईक यांनी विखेंच्या संस्थेला दिली होती साडेचार कोटींची देणगी; पहा काय म्हणाले मंत्री विखे पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details