मुंबई: खासदार संजय राऊत गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आरोप करत आहेत. मात्र आज त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यातिथिनिमित्त मोठे आवाहन केले आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, वीर सावरकर हे महाराष्ट्राचे शूर सुपुत्र होते. वीर सावरकर हे महाराष्ट्राचे महापुरुष होते. वीर सावरकरांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्याचे आवाहन खासदार राऊत यांनी केले.
एमआयएम व भाजपवर टीका: एमआयएम पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत पार पडत आहे. यावरून संजय राऊतांनी एमआयएम पक्षावर जोरदार टीका केली आहे. एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे मुस्लिम लोकांना चिथावणीखोर भाषण देत आहेत. ते पुढे म्हणाले की, भाजप आणि असदुद्दीन ओवेसी हे 'राम और श्याम की जोडी' आहेत. शिवसेना एकटीच लढेल. असदुद्दीन ओवेसी काळी शेरबानी घालून मुस्लिमांना भडकवत आहेत. हिंदूंपासून वेगळे झाल्यास मुस्लिमांना त्रास होईल, असेही ते म्हणाले. देशात मुस्लिम अल्पसंख्याक आहेत, मुस्लिमांनी हिंदूंपासून वेगळे होऊ नये; अन्यथा मुस्लिमांचे नुकसान होईल, असे राऊत म्हणाले.
ओवेसींनी केली होती टीका: एमआयएम पक्षाचे प्रमुख तथा लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर ठाण्यातील सभेत जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते की, जेव्हा राष्ट्रवादीचे अजित पवार, सुप्रिया सुळे नेते होऊ शकतात. उद्धव ठाकरे हे केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असल्याच्या बळावर नेते होऊ शकतात. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस हे नेते होऊ शकतात. महाराष्ट्रातील मुस्लिम व्यक्ती शरद पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासारखे होऊ शकत नाहीत का, असा सवाल ओवेसी यांनी केला होता.