मुंबई :खासदार संजय राऊत यांना आपण बेळगावचा दौरा करणार का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी बेळगावला जाणार आहे. बेळगावचा दौरा हा नियोजित दौरा आहे. मी सीमा भागात निवडणुकीच्या प्रचाराला जात आहे. तिथल्या जनतेच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील बेळगावात जाऊन सीमा बांधवांचा प्रचार करावा. मुख्यमंत्र्यांनी खरोखर तुरुंगवास भोगला असेल, तर सर्व बंधने झुगारून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला निघावे. मी आज बेळगावात कोर्टात हजर राहणार आहे. त्यानंतर नियोजित कार्यक्रमांना जाणार आहे.
निवडणुकीला महाराष्ट्रातून पैसा :पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव व्हावा, म्हणून उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या फौजा पाठविल्या आहेत. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पैसा गेला आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकात जाऊन माती खावी नाहीतर, आणखी काही खावे. आमची भूमिका आहे की, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा बचाव करावा. कायदेशीर अडचणी असल्या तरी आम्ही जात आहोत.
मागची 70 वर्ष बेळगावात जात आहे :संजय राऊत यांच्या बेळगाव दौऱ्यावरून नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. नितेश राणे यांना उत्तर देताना खासदार राऊत म्हणाले की, मग तुम्ही जा प्रचाराला तुम्हाला कोणी अडवले आहे? आम्ही मागची सत्तर वर्षे बेळगाव जात आहोत. आमच्या वरती तिकडे खटले सुरू आहेत. आम्ही घाबरत नाहीत. तुम्ही मराठी मातीशी आणि मराठी लोकांशी बेईमानी करत आहात.
आम्ही नेहमी चर्चा करत राहू :देशाच्या राजकारणातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला राजीनामा आहे. खासदार शरद पवार यांनी बुधवारी आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली. राज्यात नव्याने उदयास आलेल्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस हा एक घटक पक्ष आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांनी राजकीय संन्यास घेतलेला नाही. ते समाजकारणाचे आणि राजकारणाचे प्राण आहेत. विकासाची दृष्टी असलेले ते नेते आहेत. त्यामुळे ते आमच्यासोबत काम करत राहतील.
उध्दव ठाकरे सामानाच्या मुलाखतीतून :पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, जेव्हा जेव्हा गरज पडेल, तेव्हा तेव्हा आम्ही त्यांच्या मार्गदर्शनासाठी जाऊ. मी उद्धव ठाकरे यांच्याशी सोमवारी याच विषयावर प्रदीर्घ काळ या संदर्भात चर्चा केली. राजकारणातील त्यांचे स्थान कायम राहील. ते पुस्तक मी वाचलेले नाही. परंतु ते आत्मचरित्र आहे. ती व्यक्तिगत भूमिका असेल या लोकांच्या भूमिका नाहीत. या सर्व घडामोडींवर सामनातून उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध होईल. या संदर्भात सडेतोड उत्तर सामनातून मिळतील.
प्रत्येकाला बाजू मांडण्याचा अधिकार :अनेक वर्ष राजकीय प्रवास आणि संघर्ष केलेल्या राजकीय नेत्याचे ते आत्मचरित्र आहे. जर त्यात काही आक्षेपार्ह असतील तर संबंधित लोक त्याला उत्तर देतील. प्रत्येकाला बाजू मांडण्याचा अधिकार आहे. ते त्या बाजू मांडतील. उद्धव ठाकरे आपल्या भूमिका सामनाच्या मुलाखतीतून मांडतील. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या मनातील अस्वस्थता मला जाणवत होती. शरद पवारांनी भाकरी फिरवली नाही तर पूर्ण तवाच फिरायला आहे.
हेही वाचा : Nitesh Rane News: शकुनी मामाला लाज वाटेल असे संजय राऊत यांचे वर्तन- नितेश राणेंचे उद्धव ठाकरे गटावर टीकास्त्र