मुंबई : कर्नाटकच्या बेळगावी न्यायालयाने सोमवारी राज्यसभा सदस्य संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना समन्स बजावले आहे. त्यांना १ डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 30 मार्च 2018 रोजी बेळगावमध्ये दिलेल्या भाषणासंदर्भात संजय राऊत यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. या संदर्भात बोलताना संजय राऊत यांनी आपण कर्नाटकच्या बेळगाव न्यायालयात हजेरी लावणार असल्याचे सांगितले आहे. ते आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत (allegation on Karnataka Maharashtra Borderism) होते.
सरकारचा छुपा पाठिंबा :कर्नाटक राज्याचे ध्वज महाराष्ट्रात फडगवण्यात आले आहेत. या विषयावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, त्यांनी ध्वज फडकवले. यावर मला काय वाटते हे बघण्यापेक्षा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना काय वाटते? सरकारला काय वाटते. हे त्यांना विचारायला हवे. मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई हे याच प्रश्नावर कर्नाटकला जाणार असल्याचे मी वर्तमानपत्रांमध्ये वाचले. तिकडे जाऊन हे दोन मंत्री नेमके काय करणार आहेत? कुणाला भेटणार आहेत? हे त्यांनी जाहीर करायला हवे. कर्नाटकचे कार्यकर्ते महाराष्ट्रात येऊन त्यांचे झेंडे फडकवतात. कर्नाटक सरकारच्या पाठिंब्याशिवाय हे लोक अशी कृत्य करू शकत नाहीत. सोबतच महाराष्ट्राच्या सरकारमधील नेत्यांच्या छुप्या पाठिंब्याशिवाय देखील हे शक्य नाही. यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली (MP Sanjay Raut allegation) पाहिजे.