मुंबई :पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी नुकतेच जामीनावर बाहेर आलेले शिवसेनेचे फायर ब्रँड नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांचा आज 63 वा वाढदिवस (MP Sanjay Raut 63rd birthday) आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांच्या भांडुपमधील मैत्री या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केली (Sanjay Raut birthday hoardings decorate streets) आहे. संजय राऊत देखील शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या शुभेच्छा स्वीकारत असून, प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणलेला पुष्पगुच्छ स्वतः स्वीकारत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सध्या संपूर्ण महाराष्ट्रमधून कार्यकर्ते भांडुपमध्ये आले आहेत. आज सेलिब्रिटी पॉलिटिशन असलेल्या संजय राऊत यांचा प्रवास देखील तितकाच रोमांचक(birthday hoardings decorate streets in Bhandup) आहे.
राऊतांना शिवसेनेत महत्वाचे स्थान :संजय राऊत हे सध्या राज्यसभेचे खासदार असून ते शिवसेना या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. संजय राऊत यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात लेखक आणि क्राईम बीट पत्रकार म्हणून केली, ज्यामध्ये ते यशस्वी झाले. संजय राऊत यांनी आत्तापर्यंत 9 पुस्तके लिहिली असून त्यांचे शेवटचे पुस्तक 2013 मध्ये प्रकाशित झाले होते. संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते तसेच शिवसेना पक्षाचे मुखपत्र 'सामना'चे कार्यकारी संपादक आहेत. गेल्या काही काळापासून संजय राऊत यांच्यावर शिवसेनेत अनेक जबाबदाऱ्या असून, पक्षाच्या सर्व निर्णयांमध्ये त्यांच्या बोलण्याला आणि मताला स्थान आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेचा शिवसेनेचा निर्णय असो की भाजपपासून वेगळे होण्याची चर्चा असो, शिवसेनेत सर्वत्र राऊतांचे वर्चस्व दिसून येते.
जन्म आणि शिक्षण :संजय राऊत यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९६१ रोजी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे झाला. राजाराम राऊत आणि सविता राजाराम राऊत हे त्यांचे आई-वडील. त्यांचे धाकटे भाऊ सुनील राऊत हे देखील आमदार असून शिवसेनेत सक्रिय आहेत. राऊत यांनी मुंबईतील वडाळा येथील डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून बॅचलर ऑफ कॉमर्स (Sanjay Raut Birthday) केले.