मुंबई - मागील काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेले, भाजपबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करत काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे सांगणारे खासदार संजय काकडे आज भाजपच्या मंचावर उपस्थित होते. यावेळी काकडे यांची नाराजी दूर झाल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांनी खासदार संजय काकडेंची नाराजी केली दूर, पश्चिम महाराष्ट्राची दिली जबाबदारी - CONGRESS
पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास आहेत उत्सुक.
संजय काकडे यांनी पुण्यात अनेकदा भाजपवर तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. काँग्रेसमध्ये जाण्याची पूर्ण तयारी काकडे यांनी केली होती. त्यांना पुण्यातून काँग्रेसची उमेदवारी हवी होती. मात्र, काँग्रेसमध्येही उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात येताच, त्यांनी भाजप मध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
काही अडचणी होत्या, मात्र मुख्यमंत्र्यांनी समाधानकारक चर्चा केली. तसेच माझ्यावर आता पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिल्याने प्रामुख्याने पक्ष कार्य करणार असल्याचे काकडे यांनी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. पुण्यातल्या काही स्थानिक प्रश्नांवर काकडे नाराज होते, अशी कबुली मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मात्र, काकडे यांच्याशी वर्षा निवासस्थानी चर्चा करून नाराजी दूर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.